नाणार मधील तेल शुद्धीकरण प्रकल्प आता रायगड मध्ये होणार मुख्यमंत्र्यांची घोषणा



मुंबई: शिवसेनेचा प्रखर विरोध असल्याने नाणार इथं होणार असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प आता रायगड इथं होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत ही माहिती दिलीय. कुठल्याही परिस्थितीत नाणार इथं हा तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर भाजप-सेनेची युती झाली. भाजपने दिलेला शब्द पाळत प्रकल्प हलवला. आता हा प्रकल्प हलवला असला तरी कोणणातच रायगड इथं होणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, रायगडमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध नाही, 40 गावातील ग्रामस्थांचा प्रकल्पाच्या भूसंपादनाला विरोध नाही. त्यामुळे हा प्रकल्प रायगडला होणार आहे. अलिबाग, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धनच्या जवळच्या 40 गावांची जमीन यात जाणार आहे. 
विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर देत ही माहिती दिली आहे. सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने आकारास येणारा हा सुमारे तीन लाख कोटींचा भव्य तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा