एस टी समाजातील सर्व घटकांची निस्पृह सेवा करते - जयराज सूर्यवंशी (तहसीलदार )
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील एस टी समाजातील सर्व घटकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे .एस टी महामंडळाने स्थापने पासून समाज सेवेची व्रत अंगिकारले आहे .ऊन ,वारा ,पाऊस सदैव एस टी ची सेवा सर्वसामान्य माणसाला उपलब्ध आहे .गेल्या अनेक वर्षांपासून एस टी जनतेची निस्पृह सेवा करत आहे असे जयराज सूर्यवंशी यांनी सांगितले .एस टी महामंडळाच्या वर्धपान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जयराज सूर्यवंशी यांनी एस टी कामगारांशी संवाद साधला .आज एस टी च्या स्थापनेला 71 वर्ष झाली आहेत .कॉलेज ला असतांना 55 आसन असलेल्या एस टी ने प्रवास करण्याचा योग अनेकदा आला .माझ्या कॉलेज च्या मित्रांचे जेवणाचे डब्बे एस टी चा चालक व वाहक घेऊन येत असे .त्या वेळी फक्त लाल रंगाच्या बसेस होत्या आज एस टी महामंडळात विविध प्रकारच्या बसेस दाखल झाल्या आहेत .परिवर्तन ,सेमी ते शिवशाही आज प्रवाशांना चांगली सेवा आहेत .काळाच्या ओघात एस टी ने सुद्धा आपले रूप बदले आहे .नवीन तंत्रज्ञान वापरून स्पर्धेसाठी एस टी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे असे सूर्यवंशी यांनी सांगितले .
तालुका प्रशासनाचे काम सांभाळत असताना अनेकदा एस टी वाहतुकी विषयी चे अनेक प्रश्न समोर येतात .ग्रामीण भागातील शेतकरी ,कष्टकरी ,शालेय विद्यार्थी आज ही वाहतुकीसाठी एस टी वर अवलंबून आहे याची प्रत्येक वेळी प्रचिती येते .या वर्षी श्रीवर्धन तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करण्यात आला .दुष्काळाची पहिली दखल एस टी महामंडळाने घेतली आपल्या तालुक्यातील शालेय विद्यार्थी वर्गाला विनामूल्य एस टी चा पास देण्यात आला .सर्वसामान्य व्यक्ती च्या खिशाला लागणारी झळ महामंडळाने थांबवली याचे समाधान आहे .असे सूर्यवंशी यांनी सांगितले .
जेष्टनागरिक ,शालेय विद्यार्थी ,अपंग या सर्व लोकांना महामंडळाचे विशेष सहकार्य लाभत आहे .जेष्टनागरिकांना मिळणारी सवलत त्याच्या वार्धक्य प्रसंगी आनंददायी ठरत आहे .गरीब घरातील विद्यार्थी सवलत पासामुळे आपले तालुकाच्या ठिकाणचे शिक्षण पूर्ण करू शकत आहे .असे जयराज सूर्यवंशी यांनी सांगितले .आजच्या कंडक्टर कडे तिकीट मशीन आहे जुन्या काळी तिकिटे ट्रे मधून फाडून द्यावे लागत आणि त्या नंतर त्या तिकिटांचे नंबर एका कागदावर लिहण्याचे काम केले जात त्या बाबीचा मला अनकेदा विशेष वाटत असे कारण आम्ही चालू गाडीत साधे सरळ उभे राहू शकत नसू .सर्व कर्मचारी वर्गाच्या एकजूट प्रयत्नाने आज च्या एस टी महामंडळाची प्रगती साधली गेली आहे .एस टी महामंडळा कडून सदैव जनतेची सेवा तत्परतेने व्हावी अशी शुभ कामना व्यक्त करतो असे सूर्यवंशी यांनी सांगितले.
सदरच्या वर्धापन दिनी आगार प्रमुख रेश्मा गाडेकर ,सभापती मीना गाणेकर ,पत्रकार किरण उपसाने,उपसभापती बाबुराव चोरगे ,पंचायत समिती सदस्य मंगेश कोबनाक ,सुरक्षा अधिकारी शिवनाथ पाखरे , शर्वरी लांजेकर व मोठया संख्येने एस टी कर्मचारी व प्रवाशी उपस्थित होते .सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मोरे यांनी केले .
Post a Comment