म्हसळा समन्वय समितीच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती : गैर हजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस



संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुका समन्वय समितीची सभा बुधवार दि. २६ जुन रोजी सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात अध्यक्ष शैलश पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सह अध्यक्ष तथा सभापती छाया म्हात्रे ,सचिव तथा तहसिलदार शरद गोसावी,समिती सदस्य नंदकुमार सावंत, मंगेश म्हशिलकर, तुकाराम पाटिल, महेश पाटिल, सौ. कल्पना कोठावळे, सौ. धनश्री मुंढे, बिडीओ वाय.एम.प्रभे,नायाब तहासिलदार के.टी. भिंगारे,ता कृ.अ .एम.एम्. भांडवलकर,वन क्षेत्रपाल निलेश पाटील ,डेपो मॅनेजर रश्मी गाडेकर,पाणीपुरवठा उप अभियंता वा.एम. गांगुर्डे, महावितरणचे यादव इंगळे, गट शिक्षण अधिकारी संतोष शेडगे , सा.बा. चे पी.टी.जथ्थे , I.C.D.S. चे व्यंकट तरवडे,नगरपंचायत प्रतिनिधी दिपाली मुंडये म्हसळा व मेंदडी सर्कल दत्ता कर्चे व अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
म्हसळा शहरात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजना,भूमि अभिलेख कार्यालयाबाबत येणाऱ्या तक्रारी, महीला बचतगट विक्री केंदात अनधिकृत सुरु असलेले I.C.D.S. चे कार्यालय, बचत गट विक्री केंद्राची पर्यायी व्यवस्था काय केली?कृषी योजनांची माहिती शेतकऱ्याना वेळेवर न मिळणे,जिल्हा परिषद शाळेतील विदर्याथ्याच्या प्रगती व रिक्त पदांची माहिती व आढावा , नगरपंचायत शहरांत करीत असलेला दूषित पाणी पुरवठा, फिल्टरेशन प्लँट बाबत सभेमध्ये चर्चा झाली.

बैठकी मध्ये तालुक्यातील कामचुकार अधिकाऱ्यांची झाडाझडती समिती अध्यक्ष व सदस्यांनी घेतली असुन, सभेमध्ये गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यासाठी एकमताने मंजुरी दिली. 
खालील खात्यांचे अधिकारे होते गैरहजर .

१) पोलीस निरीक्षक म्हसळा, 
२) नगरपंचायत C.eo, 
३) अधिक्षक, ग्रामिण रुग्णालय, म्हसळा,
४ ) तालुका आरोग्य आधिकारी, 
५) पशुधन विकास अधिकारी, 
६ )B.S.N.L 
७) ग्राम प्रवर्तक ( संदेरी, खरसई ) 
८) लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा