पद्मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसळा तालुक्यात स्वच्छतेचा जागर.


हजारो हाताने म्हसळा शहरातून काढला १० टन कचरा शहर झाले स्वच्छ

संजय खांबेटे : म्हसळा

पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण म्हसळा शहरात डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांचे  अध्यक्ष पद्मश्री डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तालुक्यातील असंख्य श्रीसदस्य स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.सदरच्या स्वच्छता मोहिमेत म्हसळा तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन,शासकीय दवाखाना,शहरातील मुख्य रस्ते,प्राथमिक शाळा,ग्रामीण रुग्णालय,दुय्यम निबंधक कार्यालय,महावितरण कार्यालय स्वच्छ करण्यात आले. हे स्वच्छ करण्यासाठी प्रतिष्ठानने हँडग्लोज, मास्क इ. साहित्य पुरवण्यात आले होते.

प्रतिष्ठानच्या या लोकोपयोगी कार्याला तालुक्यातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.तालुक्याचे तहसीलदार,गटविकास अधिकारी,आरोग्य अधिकारी यांनी प्रतिष्ठान राबवीत असलेल्या अशा लोकोपयोगी कार्यामुळे शासनाचा कितीतरी भार हलका होत असल्याचे सांगितले.शासनाचा अनेक बाबींवरील होणारा खर्च प्रतीष्ठ्नच्या अशा कार्यामुळे वाचला असल्याचे त्यांनी सांगितले.या कामात तालुक्यातून 700 श्रीसदस्य सहभागी झाले होते. श्रीसादास्यांच्या या विनामूल्य केल्या जाणार्या कामामुळे शासन सदरच्या बाबींवर होणरा खर्च इतर लोकोपयोगी कामावर करू शकतो.या पूर्वीही प्रतिष्ठानने तालुक्यात धरणातील गाळ काढून त्याची पाण्याची पातळी वाढविणे, वृक्षारोपण, वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन,लोकांसाठी पाणपोई,अनेक ठिकाणी गावात बस स्थानके,अनेक गावात प्रवेशद्वार अशी कामे करून हिताची कामे केली आहेत.

म्हसळा तालुक्यात आजवर प्रतिष्ठाणने विविध समाजपयोगी कार्य केले आहे.तालुक्यात दोन पाणपोई,बस निवारे,आरोग्य शिबीर,स्वच्छता मोहीम,तसेच जे शासनाला जमले नाही ते मेंदडी मधील धरणातील 62000 ब्रास गाळ काढून आजवर 5 गावे व अन्य वाड्या यांच्या 16000 पेक्षा लोकांना पाणी टंचाई मुक्त करण्याचे महान कार्य या प्रतिष्ठानने केले आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात प्रथमच म्हसळा तालुक्यात डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यामतून 2300 जातीचे दाखले विनाशुल्क वाटप करण्याचे विक्रमी कार्य केले आहे.दाखले वाटप कार्यक्रमाचे गावागावात शिबिरे राबवून घराघरात जाऊन दाखले वाटप प्रतिष्ठानने केले.दाखले खराब होऊ नयेत म्हणून त्यांना विनामूल्य लमिनेषण करून दिले.त्यामध्ये विशेष करून आदिवासी वर्गाला प्राधान्य देण्याचे कार्य  या प्रतिष्ठानने केले. त्याचप्रमाणे वय वर्षे 60 पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी शासनाच्या सेवांचा लाभ मिळण्यासाठी जेष्ठ नागरिक व वय अधिवास (domacial) दाखले बनवण्याचे काम सुरु आहे.



  डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान राबवीत असलेले हे उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून त्यातून  लोकांमध्ये नजागृती होऊन जनता आज स्वच्छतेच्या बाबतीत सकारात्मक असल्याचे तालुक्यात दिसते.आजवर अशा विविध कार्याबद्दल म्हसळा तालुका प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आप्पासाहेब तसेच सचीनदादा धर्माधिकारी,उमेशदादा धर्माधिकारी,राहुल दादा धर्माधिकारी यांचे आभार व्यक्त करत असल्याचे सांगितले.

विशेष म्हणजे यं स्वच्छता मोहिमेत म्हसळ्यातील जेष्ठ समाजसेवक सुरेशभाऊ कुडेकर यांनी सकाळपासून स्वछातेमोहीमेत स्वतः हातात झाडू घेऊन शेवटपर्यंत श्रीसदस्यांसमवेत स्वच्छता करत होते. ते बोलताना म्हणाले की,आपल्यापासून स्वच्छतेची सुरुवात करावी.प्रतिष्ठानचे कार्य हे संपूर्ण जगाला आदर्श ठरावे असे कार्य आहे,या कार्याचा स्वीकार प्रत्येक नागरिकाने केला तर निश्चित आपला देश हा स्वच्छ होईल हे नाकारता येणार नाही.आजवर प्रतिष्ठानने केलेले कार्य निस्वार्थपणे केले आहे. त्यांच्या कार्याची महती आम्ही काय वर्णन करावी? 

प्रतिष्ठान राबवीत असलेल्या या उपक्रमंसारखे जनतेनेही तेवढेच मनावर घेऊन आपला गाव,तालुका,जिल्हा स्वच्छ ठेवल्यास शासनाची स्वच्छ भारत हि संकल्पना अमलात येण्यास वेळ लागणार नाही.  


स्वच्छता मोहिमेत 1 म्हसळा तहसील कार्यालय, 2 पोलीस स्टेशन, 3 शासकीय दवाखाना, 4 शहरातील मुख्य रस्ते, 5 प्राथमिक शाळा,6 ग्रामीण रुग्णालय, 7 दुय्यम निबंधक कार्यालय, 8 महावितरण कार्यालय, 9 पंचायत समिती कार्यालय स्वच्छ करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा