म्हसळा : प्रतिनिधी
१२ मे २०१९ रोजी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केल्टे या डिजिटल वर्ग खोली शाळेचे उद्घाटन मा. श्री. सुबोध म्हात्रे साहेब यांच्या शुभहस्ते व मा. श्री. कृष्णा महाडिक यांच्या उपस्थितीत पार पडले. विशेष सहकार्य राजु कासरुंग, गणपत सावंत यांचे लाभले. यावेळी उपस्थित ग्रामपंचायतच्या सरपंच आरतीताई कासरुंग, गाव अध्यक्ष अनंत धाडवे, महिला अध्यक्षा शेवंती कासरुंग, माजी सरपंच रामचंद्र बोर्ले, ग्रां.पं. सदस्य मंदिनी धाडवे, समाजसेवक सुहास महागावकर, गणेश बोर्ले, मदन वाजे, संजय लटके, विजय लटके, संजय बोर्ले, काशिराम लाड, सुनिल दिवेकर, पोलिस पाटिल किसन पवार, दौलत पवार, दिलीप गीजे, मुख्याध्यापक सुनिल पवार, उपशिक्षक राजु राठोड, प्राथमिक शिक्षक जयसिंग बेटकर, उमेश पवार, ज्ञानेश्वर कोबनाक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुकुंद बोर्ले, उपाध्यक्षा अपर्णा जावळेकर, माता-पालक समिती उपाध्यक्षा निलाक्षी कासरुंग, शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष गुरुनाथ जावळेकर आणि ग्रामस्थ मंडळ व प्रगती महिला मंडळ केल्टे जातीने उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे श्री. कृष्णाजी महाडिक साहेब यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या डिजीटल युगात शिक्षणामध्ये नवीन तंत्रज्ञानाची खुप आवश्यकता आहे. विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरवत असताना त्याला डिजिटल द्वारे ते चित्र प्रत्यक्ष क्षणी पडद्यावर पाहिले असता ते जास्त काळ त्या विद्यार्थ्याच्या स्मरणात राहते. समाजसेवेचे घेतलेले व्रत नक्कीच आपण समाजात पाणी, आरोग्य आणि शिक्षण यावर आपण भर देत आहोत. महाडीक साहेब यांनी स्वतःचे शिक्षण चालु असताना जीवनात आलेले विविध अनुभव त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
आजच्या काळातला विद्यार्थी धावत्या युगानुसार बदलते आहे. आणि त्याला बदलण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची गरज आहे. आम्ही आपल्या श्री. सुबोध म्हात्रे यांच्या प्रेरणेने या केल्टे शाळेला बहुमोल सहकार्य करून डिजिटल साहित्य भेट देऊन नक्कीच हे विद्यार्थी शाळा उपयोग करतील असे मनोगत व्यक्त केले. सुबोध म्हात्रे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे चांगले निसर्ग रम्य शाळा असे वर्णन केले. आणि शिक्षक, विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेला मिळालेल्या पुरस्कारांबद्दल अभिनंदन गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेशजी बोर्ले यांनी केले. स्वागत मुख्याध्यापक सुनिल पवार सर यांनी केले. आणि आभार प्रदर्शन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुकुंद बोर्ले यांनी केले.




Post a Comment