खरसई चा सुपुत्र सिद्धांत म्हात्रे मुंबई विभागातून प्रथम ; पुढे राज्य स्तरीय स्पर्धे साठी निवड.


खरसई चा तबला वादक सिद्धांत म्हात्रे  महाराष्ट्र टपाल विभागाच्या कल्चरल मीट मुंबई विभागातून प्रथम : राज्य स्तरीय स्पर्धे साठी निवड.
वर्ष २०१९-२० साठी महाराष्ट्र टपाल  विभागाच्या कल्चरल मीट नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत तबला  वादक सिद्धांत महादेव म्हात्रे यांची मुंबई पोस्ट रीजनमध्ये पहिला आला असून, त्याची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत पोस्ट खात्यातील अनेक कर्मचारी आणि ख्यातनाम वादक सहभागी झाले होते. तसेच कार्यक्रमाचे परीक्षण प्रसिध्द निर्माता/दिग्दर्शक मा. सदानंद राणे व मा. मानसी राणे यांनी केले. प्रसंगी पोस्ट खात्यातील मुंबई विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सिध्दांत च्या या निवडीसाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर पुढे पुण्यात होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठीही त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा