भारत चोगले : श्रीवर्धन
नारळ हे श्रीवर्धन तालुक्यातील महत्त्वाचे पीक असून या पिकावर तालुक्यातील काही नारळ बागांमध्ये चक्राकार पांढ-या माशीने शिरकाव केलेला आहे त्यामुळे काही ठिकाणी सध्या चक्राकार पांढ-या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे . या किडीचे वेळीच नियंत्रण केल्यास होणारे नुकसान टाळता येऊ शकते असे तालुका कृषी अधिकारी श्री शिवाजी भांडवलकर यांनी सांगितले .
ही कीड तामिळनाडू, केरळ व कोकणातही दिसून येते या किडीचा उगम उत्तर अमेरिकेतील बेलीझ येथे झाला असून २००९ मध्ये या किडीचा प्रादुर्भाव प्रथम नोंद शोभिवंत वनस्पतीवर फ्लोरिडा येथे घेण्यात आली या किडीचा प्रसार वाऱ्यामार्फत पक्षामार्फत तसेच फळे एका ठिकाणाहून दुस - या ठिकाणी नेताना होतो चक्राकार पांढरी माशी ही रसशोषण करणा-या किडी असून २ . ५ मीमी लांबीची असते माशीच्या पंखाच्या जोडीवर फिकट तपकिरी पट्टे तर डोळे राखडी दिसून येतात नर आकाराने लहान असतो. अंडी लंब वर्तुळाकार पिवळसर रंगाची असून ती चक्राकार घातलेले असतात आणि ती मेणचट पांढरट आवरणाने झाकलेली दिसून येतात , त्यामुळे या किडीचे नाव चक्राकार पांढरी माशी असे पडले प्रौढ माशीच्या शरीराच्या खालील बाजूस ग्रंथीमधून स्राव बाहेर येत असतो या किडीच्या प्रथमावस्थेतला पाय असून ती हालचाल करू शकते तर प्रौढ अंडाकृती असून पांढरट पिवळसर रंगाची असते आणि त्यावर पांढरे मेणचट आवरण दिसून येते . या किडीची पिल्ले आणि प्रौढ दोघेही पानाच्या खालच्या बाजूस रस शोषून घेतात चक्राकार पांढरी माशी शरीरातून गोड चिकट स्त्राव सोडत असल्यामुळे त्याकडे असंख्य मुंग्या आकर्षित होतात व त्यामुळे स्राव सर्वत्र पानावर पसरत असतो पानाच्या वरच्या बाजूवर गोड चिकट स्राव दिसून येतो आणि त्यावर काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ होते त्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला तर नारळ फळांवर चक्राकार आवरणात अंडी व प्रौढ दिसून येतात. या किडींची नोंद ४३ कुळातील ११८ वनस्पतीवर दिसून आली असून त्यामध्ये पेरू केळी सीताफळ आंबा तसेच शोभिवंत वनस्पती समावेश आहे तसेच श्री भांवलकर यांनी या किडीच्या नियंत्रणासाठी किडीचे नैसर्गिक शत्रू उदा क्रयसोफा , ढालकिडा इत्यादी बागेत संवर्धन करावे ज्या क्षेत्रामध्ये हे परोपजीवी कीटक दिसून येतात अशा क्षेत्रांमध्ये ते गोळा करून प्रादुर्भावित बागेत सोडावे म्हणजे किडीचे जैविक व्यवस्थापन होईल शक्यतो पानाच्या खालच्या बाजूस पाण्याचा हलका फवारा करावा जेणेकरून नैसर्गिकरित्या कीटक त्यावर उपजीविका करतील या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ३ मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा 0 . ५0 टक्के निमतेल फवारावे पानावरील काळ्या बुरशीच्या व्यवस्थापनासाठी १ टक्का स्टार सोल्युशन फवारावे तसेच पांढरी चक्राकार माशी आकर्षित करण्यासाठी पिवळे चिकट सापळे झाडवरती लावावेत असे सांगितले . ह्या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास तालुका कृषी कार्यालय ( दूरध्वनी 0२१४७ - २२२०७४ ) किंवा आपल्या गावातील कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा असे अहवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे .

Post a Comment