नगरपंचायत प्रशासन शहरातील नागरीकाना समान, स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या मनस्थितीत.
आस्मिता पोतदारनी महीलांसाठी घेतले उग्र स्वरूप
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरांतील पाणी प्रश्न गंभीर होत असताना शहर संघर्ष समितीने आंदोलन तीव्र करु नये म्हणून प्रशासनाने नगरपंचायत प्रशासन, पदाधिकारी पदाधिकारी व संघर्ष समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते पण संघर्ष समिती मंगळवार दि. १४ मे च्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम अशीच भावना संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची दिसली.
म्हसळा शहराची पाणी समस्या , टँकरने होणारा दूषीत पाणी पुरवठा, तब्बल १० वर्ष व दोन वेळा भूमीपूजन होऊनही अडकलेली न.पा. पु.योजना, या सर्व अनुषंगाने नगरपंचायत प्रशासन व म्हसळा नगरपंचायतीच्या Ceo चा भ्रष्टाचारी कारभार, म्हसळा नगरीतील सर्व नागरीकाना सम प्रमाणात , स्वच्छ, शुद्ध व पिण्यास योग्य पाणी पुसवठा व्हावा
या न्याय्य मागणीचे प्रशासनाने गांभीर्य ओळखून नायब तहसीलदार के.टी. भींगारे यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या वेळी सपोनी प्रविण कोल्हे, म्हसळा नगरपंचायतीचे प्रभारी Ceo समीर जाधव, अ. का. गोवीन्दराव चाटे, नगराध्यक्षा श्रीमती फलक नाझ हुरझुक, उपनगराध्यक्ष संजय कर्णिक, पाणी समीती चेअरमन दिलीप कांबळे, संघर्ष समितीचे संजय खांबेटे, नदीम दफेदार, सुरेश शेठ जैन,सचिन करडे , विशाल सायकर, कल्पेश जैन,संतोष उद्धरकर, गणेश हेगीष्टे, यतीन करडे, महावीर जैन, नगरसेविका श्रीमती आस्मिता पोतदार, जयश्री कापरे ,0. S. दिपाली रामा मुंडये, फिटर नदीम अन्य उपस्थित होते.
संघर्ष समिती व नागरीकांच्या आभ्यासू मागणीचा नगरपंचायत प्रशासन आदर करते , सोमवारी तातडीने G. B. ची मीटींग लावून योग्य तो निर्णय तहसीलदार म्हसळा व संघर्ष समितीला कळविण्यात येईल असे आश्वासन यावेळी प्रभारी Ceo समीर जाधव यानी बैठकीत दिले.
बैठकीत पाणी समीतेचे अध्यक्ष दिलीप कांबळे यानी रोज टँकर व्दारे शहरात ७० हजार लीटर पाणी दारोदार फिरुन देतो असे सांगीतले तर संघर्ष समितीने पाणी टाकीत सोडून वाटप करावे अशी मागणी केली असता अनुत्तरीत का झाले ? तर वाहत्या पाण्यात व उघड्यावर असलेले TCL टाकून पाणी शुद्धीकरण कसे होते या संघर्ष समिती च्या प्रश्नावर Ceo अनुत्तरीत होते.
" बैठकीत नगरसेविका अस्मिता पोतदार यानी पाणी समान, पिण्यास योग्य व स्वच्छ असावे या संघर्ष समितीच्या मागणी सोबत मी ठाम आहे , त्यांची मागणी न्याय्य , पारदर्शक व आभ्यासू आहे, आम्हाला वापराचे, पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते असे बैठकीत सांगीतले व नगरपंचायत प्रशासनाला जबरदस्त धक्का दिला"



Post a Comment