श्रीवर्धन शहरात सुनील तटकरे यांची जल्लोषात मिरवणुक
श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
रायगडच्या मातीने सदैव आपली अस्मिता अबाधित ठेवत नाविन्याचा स्वीकार करून निरंतर लढा दिला आहे .देशात कमळाची सुनामी असतांना श्रीवर्धन च्या समुद्रातील लाटांनी माझा संसद भवना पर्यंतचा रस्ता निर्माण केला .श्रीवर्धनच्या जनतेचा विकास हाच माझा ध्यास असेल असे सुनील तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित विजयी मिरवणूकीची सांगता शिवाजी चौकात झाली त्या प्रसंगी नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी जनतेशी संवाद साधतांना त्यांनी सांगितले आयुष्यात अनेक विजय राजकीय जीवनात अनुभवले परंतु आज हा विजय अनेक दृष्टीने वेगळा आहे .देशात मोदीं फॅक्टर यशस्वी झाला आहे .मात्र रायगड आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले आहे .मी दुसऱ्यावर टीका करण्या पेक्षा जनतेच्या प्रश्नांना व अडीअडचणीला सोडवण्यासाठी सदैव प्राधान्य दिले व देत आहे .आज त्याचे फलित म्हणून मला श्रीवर्धन मतदारसंघातून भरघोस मताधिक्य मिळाले आहे .जनतेने माझ्यावर ठेवलेला विश्वास आगामी काळात निर्विवाद पणे सिद्ध करून रायगडच्या मातीची अस्मिता संसदेत उमटल्या शिवाय राहणार नाही .मी आजन्म साधा कार्यकर्ता आहे व भविष्यात सुद्धा साधा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहील .यशाची हवा आज पर्यंत कदापी माझ्या डोक्यात जात गेली नाही व आगामी काळात सुद्धा यशाने मी हुरूळून जाणार नाही .श्रीवर्धन तालुक्याला विकास कामासाठी कधीच निधीची कमतरता भासू दिली नाही .आता खासदार निधी तून श्रीवर्धन तालुक्यातील विविध विकास कामांना चालना देण्याचे माझे दायित्व आहे .माझा राजकीय प्रवास बॅ अंतुले याच्याशी मिळता जुळता आहे . अंतुले याचा राजकीय वसा मी प्राप्त झाला आहे .राजकारणाच्या माध्यमातून कोकणचा विकास साधण्याची किमया मी करून दाखवणार आहे .असे सुनील तटकरे यांनी सांगितले .तसेच भविष्या विषयी भाकीत करतांना त्यानी सांगितले आगामी 2024 हे आपल्या सत्तेचे वर्ष असेल त्या नुसार आपण सर्वांनी काम करणे अभिप्रेत आहे .राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निधर्मी तत्वांचा पालन करणारा आहे .संसदेत जेव्हा कधी भारतीय संस्कृतीत रुजलेल्या धर्मनिरपेक्ष विचारावर गंडांतर येईल तेव्हा मी त्यांचा निश्चित व ठाम पणे विरोध करेल .संविधानाने दिलेल्या हक्काचा वापर लोकशाही च्या मजबुती साठी करणे हे माझे कर्तव्य आहे व ते मी सदैव करणे .श्रीवर्धन मतदार संघातील प्रत्येक मतदारांचा मी ऋणी आहे त्याच्या अथक प्रयत्न व परिश्रमातून मी विजयी झालो .माझ्या पक्षाचा प्रत्येक कार्यकता हा लोक सेवेसाठी निरंतर प्रयत्नशील राहील असे सुनील तटकरे यांनी सांगितले .सदर मिरवणूक सांगतेच्या प्रसंगी अनिकते तटकरे यांनी श्रीवर्धन मधील जनतेचे आभार मानले .व आगामी काळात निरंतर सेवा देण्याचा शब्द दिला .सदरची विजयी मिरवणूक श्रीवर्धन शहराच्या प्रवेशद्वार ते शिवाजी चौक काढण्यात आली .मिरवणूक प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे ,नरेंद्र भुसाने ,दर्शन विचारे ,गणेश पोलेकर ,राजेंद्र भोसले ,मोतीराम परभळकर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
Post a Comment