प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
मंगळवार दिनांक १४ मे २०१९ रोजी शिवगर्जना क्रिड़ा मंडळ खरसई सामाजिक सभागृहाचे उदघाटन मा. श्री. कॄष्णा कोबनाक श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले. सदरचे सामाजिक सभागृह हे सामाजिक व सांस्कृतिक कामासाठी वापर करावा असे आवाहन करण्यात आले. समाजाच्या माध्यमातून सामाजिक काम करून समाजाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा. असे सांगण्यात आले. यावेळी श्री.महेश पाटील जिल्हा चिटनीस युवा मोर्चा,श्री. प्रकाश रायकर तालुका सरचिटणीस, श्री.समीर धनसे तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक मोर्चा, श्री. मनोहर जाधव तालुका अध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा, रुपाली भायदे तालुका उपाध्यक्ष महिला मोर्चा,श्री. गोविंद भायदे सह संपर्क प्रमुख कोकण विकास आघाडी इत्यादि मान्यवर उपस्थित होते. प्रसंगी संस्थाप्रमूख श्री. पांडूरंग कांबळे. ,अध्यक्ष चंद्रकांत ना. खोत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा. परशुराम मांदाडकर श्री. हरीचंद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली होती.

Post a Comment