तोंडसुरे प्रादेशिक पाणी योजना : तात्काळ टँकरने पाणी पुरवठा करावा ग्रामस्थांची मागणी ; अन्यथा २१ मे ला हंडा मोर्चा

फोटो : तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पदाधिकारी नायब तहसीलदार के .टी. भिंगारे याना निवेदन देताना.

संजय खांबेटे म्हसळा
       तोंडसुरे प्रादेशिक पाणी योजने अंर्तगत तोंडसुरे सह ८ गावे आणि ४वाडयाना पाणी पुरवठा करणारी तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी योजना आहे.  लघु पाटबंधारे विभागाचे पाभरे धरणातून या योजनेला तसेच कांदळवाडा , निगडी या दोन ग्रामपंचायतीना सुध्दा याच धरणातून पाणी पुरवठा होत असतो गेले १५ या १० गावे व ४ वाडयाना पाणी पुरवठा बंद आसल्याने सर्व नागरीकाना टंचाईला सामोरे जावे लागते त्यामुळे शासनाने तात्काळ टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष महादेव चागू पाटील आणिअन्य सरपंच , उपसरपंच व पदाधिकारी यानी आज नायब तहसीलदार के .टी. भिंगारे  यांचेकडे  दिलेल्या निवेदनाने केली आहे. निवेदन देतेवेळी स. भी. पवार, सरपंच अनिता खोतनथुराम खोत, जर्नादन गाणेकर, अनंत नाक्ती , गणू बारे, अनिल बसवंत,टिंगरे, शेखर खोत, अॅड. मुकेश पाटील, रियाज फुकीह ,पांडुरंग सुतार, काशिराम खोत, गोवींद भायदे, महादेव भिकू पाटील, गोविंद कांबळे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते .
     
      शासनाचे  लघु पाटबंधारे विभागाचे मार्फत  टंचाईच्या कार्यकाळात पाभरे धरणाचे दुरूस्तीचे काम हाती घेऊन धरणातील बहुतांश पाणी विसर्ग केल्याने पाभरे धरणावर अवलंबून असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना आता पाण्याअभावी ठप्प झाल्या आहेत याचा मोठा फटका तोंडसुरे नळ पाणी पुरवठा योजनेवर पडला आहे या योजनेवर अवलंबून असलेली १० गावे आणि ४ वाड्याना होत असलेल्या पाणी टंचाईकडे शासन दुर्लक्ष करीत आहे आसा  ग्रामस्थांचा आरोप आहे. यापूर्वी २५ मार्च व १३ मे रोजी निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात आल्याचे तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा