टँकर मुक्त म्हसळा तालुका टॅंकर युक्त करा तालुक्यांतुन मागणी



तालुक्यांत आली टिपकवणी : वनाच्छादीत देहेन गावातील पाणी संपले.

संजय खांबेटे : म्हसळा 

   म्हसळा तालुका गेली २५ वर्ष टँकर मुक्त असलेला तालुका म्हणून नोंद असलेला तालुका आहे.तालुक्यातील बहुतांश न.पा. पु. योजना या ग्रॅव्हेटीवर आधारीत आहेत . मात्र आज मीतीला तालुक्यातील अनेक गाव वाडयाना पाणी टंचाईने ग्रासले आहे.दुसऱ्या बाजूने प्रशासकीय अधिकारी टँकर मुक्त म्हसळा तालुक्याला आम्ही टॅकर पुरवीणार नसल्याचे कारण जोराने रेटतात. तालुक्यातील सर्वात दाटीने जंगल व झाडी असलेल्या देहन , चिखलप गौळवाडी, आदीवासी वाडी भागात तीव्र पाणीटंचाई सुरु आसल्याचे सरपंच अनिल  जोशी यानी आमचे प्रतिनिधीला सांगितले. गावांतील महीला जंगलात वण वण फिरून केवळ दोन हांडे पाणी मिळत आसल्याचे त्यानी सांगितले.तालुका, जिल्हा प्रशासन टंचाई विषयी लक्ष देत नसल्याने शासनाने टँकरने पाणीपुरवठा करावा अशी सरपंच अनिल जोशी व गाव अध्यक्ष सुरेश ठोंबरे यांची मागणी आहे.तालुक्यातील पाभरे घरणावर अवलंबून आसणाऱ्या तोंडसुरे प्रादेशिक योजनेतील १० गावे ४ वाडया शासना जवळ टंचाईवर मात करण्यासाठी लढा देत असतानाच तालुक्यातील देहेन, चिखलप गौळवाडी, आदीवासी वाडी, निवाची वाडी , गायरोणे, खारगाव ( बु ), साळविंडे अशा अनेक गावाना पाणीटंचाईची झळ पोहचत आहे.



"तालुका गेली २५ वर्ष टँकर मुक्त आहे, अनेक उद्भवावर ग्रॅव्हेटीने विविध योजना आहेत. आशा योजनांवर वन, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, जलयुक्त शिवार, शाश्वत शेतीसाठी व पिण्याचे पाण्यासाठी ठोस उपाय योजना , शिवकालीन उपाय योजना अशा पध्दतीने विविध उपाय योजना न केल्यामुळे तालुक्यात या वर्षी टंचाई सदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे"
-महादेव पाटील माजी सभापती , पं.स. म्हसळा

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा