चार वर्षापासून श्रीवर्धन आगारात वाहक म्हणून आहेत कार्यरत
देव हा देवळांत नसुन, तो दीनदूबळ्या,अनाथ, वंचितांमध्ये आहे,या राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचाराने प्रेरित होऊन कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते ,शिक्षणप्रेमी मा.श्री. मिठ्ठू त्रिंबक आंधळे यांना बीड जिल्ह्यातील स्वाभिमानी प्रबोधनीचा अनाथांचे कृपाछत्र पुरस्कार अध्यक्षा मा.सौ.नंदाताई सारूक यांनी कार्याची दखल घेऊन नुकताच जाहीर केला आहे. स्वाभिमानी प्रबोधनीच्या अध्यक्षा मा.सौ.नंदाताई सारूक यांनी आजपर्यंत तळागाळातील विविध सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्वाचा सन्मान केला आहे.
मिठ्ठू आंधळे हे अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्तीमत्व आहे. ते सध्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एस.टी.वाहक म्हणून कार्यरत आहेत. शालेय जीवनापासून ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी महाराष्ट्रातीन अनाथ, वंचित तसेच गरीब 60 हुन अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. त्यांनी श्रीवर्धन तालुक्यातील राजिप शाळा आदगांव येथील पण 4 मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. आजपर्यंत 29 वेळा रक्तदान, मरण्णोत्तर नेत्रदान संकल्प केला आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात त्यांनी महाराष्ट्रातील बीड,अहमदनगर, यवतमाळ, नागपूर, रायगड तसेच सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 150 हुन शाळाबाह्य, शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शाळेत दाखल केले. त्यांच्या विविध उपक्रमाची दखल महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने पण घेतली आहे. आपल्या शाळेतील प्रत्येक मुलांचा वाढदिवस ते वही, पेन,तसेच पुस्तके देऊन साजरा करतात.तसेच स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पण विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.तसेच विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन करत असतात. ते सदैव विविध सामाजिक,शैक्षणिक उपक्रम राबवित असतात.
त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्य समता शिक्षाच्या समन्वयक नुतनजी मघाडे,गेवराईचे जे.शि.विस्तार अधिकारी प्रविणकुमार काळम पाटील, श्रीवर्धनच्या उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य डॉ. मधुकर ढवळे, समन्वयक अनिल खंडाळे,
श्रीवर्धनच्या आगारप्रमुख रेश्मा गाडेकर, शर्वरी लांजेकर, नारायण पवार , उदय हाटे, मुख्य लेखनिक भारत राठोड, डॉ. कानिफनाथ सारूक, डॉ. प्रविणकुमार फड, रामनगरचे मुख्याध्यापक गणेश चव्हाण,शिक्षिका शितल नाईकवाडे, पत्रकार तथा अभिनव भारतचे संतोष सापते, पत्रकार अभय पाटील, माईंड क्लासेसचे नवनाथ पवार, ब्रम्हनाथ कोकरे, सामाजिक कार्यकर्ते लहुराव मिसाळ, आर.आर.आबा बहिर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केलेे.

Post a Comment