महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट म्हसळा शाखेचा 21वा वर्धापन दिन साजरा
म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
द्वापारयुगामध्ये भगवान श्रीकृष्णाने सर्व सवंगड्यांना सोबत घेऊन महान कार्य केले होते त्याच भगवान श्रीकृष्णाची भक्ती करून भगवंताचे विचार आचरणात आणीत गवळी समाज बांधवांनी सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन श्रीकृष्णाच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे असे मौलिक प्रतिपादन महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष श्री.प्रदिप उर्फ बाबा धुमाळ यांनी मोरवणे येथे आयोजित महाराष्ट्रीय या.चॅरिटी ट्रस्ट म्हसळा शाखेच्या 21 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना केले आहे.
वर्धापनदिन कार्यक्रम निमित्ताने महिलांसाठी हळदीकुंकू व विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याचप्रमाणे श्री समर्थ ग्राम विकास मंडळ मोरवणे यांनी सत्यनारायण महापूजा व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
यावेळी प्रदिप धुमाळ यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की महाराष्ट्रात गवळी समाजाची ताकद खूप मोठी आहे तसेच सामाजिक ऐक्याची भावना आणि सामाजिक समतोल टिकवून ठेवण्याची क्षमता समाज बांधवांमध्ये परंपरागत लाभलेली आहे. त्याचबरोबर गवळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत असे अभिवचन दिले. वाडवडिलांनी समाज संघटनेचे लावलेले रोपटे त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे या वृक्षाची जोपासना करण्यासाठी व समाजातील सर्व नागरिकांना ट्रस्टचे फायदे, सुविधा मिळवून देण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे असेही सांगितले. म्हसळा शाखेची इमारत मागणीची पूर्तता करून लवकरात लवकर शहरात इमारत बांधली जाईल असे अभिवचन समाज बांधवांना देऊन महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट कडून मिळणाऱ्या सेवा सुविधांचा जास्तीत जास्त समाज बांधवांनी लाभ घ्यावा असे आव्हाहन करून म्हसळा तालुका शाखेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगताना तालुका शाखेचे मालकी संकुल उभारण्यासाठी माझे सर्वतोपरी सहकार्य राहील. गरीब विद्यार्थ्यांसाठी आणि रुग्णसेवा कामी ट्रस्ट कडुन दिली जाणारी मदत हि अल्प आहे त्यात वाढ करण्याचा माझा प्रयत्न असेल. राज्य पातळीवर गवळी समाजाला एन टी-बी चा आरक्षण मिळाला आहे त्याचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातूनही होण्यासाठी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट योग्य तो पाठपुरावा करेल असे प्रदिप धुमाळ यांनी उपस्थितांना आश्वाशित केले.
जेष्ठ समाजसेवक सुहास महागावर यांनी आजच्या दुष्काळी परिस्थिती बाबत मार्गदर्शन करताना वृक्ष लागवड व संवर्धन तसेच पर्यावरण संरक्षण बाबत विचार मांडले आणि पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम सर्व समाज बांधवांनी आपल्या आपल्या गावात राबविली पाहिजे असा महत्वाचा संदेश दिला त्याचबरोबर महिला वर्गानी सर्वच क्षेत्रात काम करताना उत्तम प्रगती केलेली असून गवळी समाजाच्या उन्नतीसाठी महिलांनी देखील निर्भीडपणे त्यांचे विचार मांडले पाहिजेत असे सांगितले.
माजी अध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी म्हसळा तालुका शाखेची इमारत होण्यासाठी लेखी ठराव सादर केला तर विश्वस्त प्रीती खताते यांनी महिलांनी ट्रस्टी मध्ये जास्तीत जास्त संख्येने सभासद नोंदणी करावी माझे कार्यकाळात म्हसळा तालुका शाखेची इमारत तयार व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. माजी नगराध्यक्ष यांनी गवळी समाज आज पुढारलेला आहे,समाजाची झेप राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात पुढे गेल्याने अनेक ठिकाणी समाज मान्यवरांना ग्राम पंचायत सदस्य ते आमदार व मंत्री पदावर काम करीत असल्याचा अभिमान आहे असे सांगितले.
मुंबई कमिटी अध्यक्ष व स्थानिक अध्यक्ष रामदास रिकामे यांनी ट्रस्टचे सामाजिक कार्य तळागाळातील समाज बांधवांपर्यत पोहचवू आणि येणाऱ्या काळात म्हसळा शाखेची स्वतःची इमारत शहरात निर्माण करू असे अभिवचन समाज बांधवांना दिले. त्याचबरोबर विश्वस्त प्रिती खताते, माजी अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी खजिनदार शांताराम घोले, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, अशोक काते, गणेश वाजे, मधुकर गायकर या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक हिताचे विचार मनोगत व्यक्त करताना मांडले.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष प्रदिप धुमाळ, विश्वस्त प्रिती खताते, श्रीवर्धन शाखा विश्वस्त सुरेश तांबडे, समाजसेवक सुहास महागावकर, माजी अध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी खजिनदार शांताराम घोले, स्थानिक अध्यक्ष रामदास रिकामे, मुंबई कमिटी अध्यक्ष शांताराम गायकर, माजी कार्याध्यक्ष दिलीप कांबळे, माजी अध्यक्ष गणेश वाजे, यादव उन्नती संस्था अध्यक्ष अशोक काते, पुणे शाखा सचिव सचिन दिघे, मधुकर गायकर, उपाध्यक्ष सुनिल महाडिक, नगरसेवक संजय दिवेकर, सचिव सुजित काते, मुंबई सचिव दिपक धुमाळ, प्रभाकर खताते, रविंद्र तटकरे, तुकाराम दिवेकर, पत्रकार जितेंद्र नटे, निलेश लाड, अनिल रिकामे, मोहन किळजे, अनिल बिरवाडकर, खजिनदार महेश घोले, मधुकर लाड, अनंत रिकामे, रमेश रिकामे, माजी सरपंच राधिका काते, सरपंच सोनल घोले, उपसरपंच वैदही लाड, आदी पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment