श्रीवर्धन मध्ये संत शिरोमणी गोरोबाकाका पुण्यतिथी साजरी ; मानवतेला जिवंत ठेवण्याचे काम संतानी केले ...वसंत यादव


श्रीवर्धन : संतोष सापते 
समाज विचारक्षम बनावा व त्या द्वारे समाजाची प्रगती साधली जावी या हेतूने संतांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले .जगातील मानवता जिवंत ठेवण्यात संतांची व संत साहित्याची  महत्वाची भुमिका आहे .असे वसंत यादव यांनी सांगितले .
श्रीवर्धन तालुक्यातील गालसुरे कुंभार समाजाच्या वतीने गोरोबाकाका पुण्यतिथी निमित्त  गुणवंत विदयार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला .त्या प्रसंगी विदयार्थी व जनसमुदायास वसंत यादव यांनी संबोधित केले .महाराष्ट्राच्या भूमीला संतांची उज्जवल परंपरा लाभली आहे .भागवत संप्रदायात  संतांनी आपल्या निर्मळ व निस्वार्थी कार्यातून समाज मन सजग करण्याचे महंत कार्य केले .ज्ञानेश्वर माऊली ,तुकाराम महाराज  ,नामदेव व गोरोबाकाका या सर्व संतांनी हिंदु धर्मात सामाजिक ऐक्य निर्माण केले . संतांनी समाजाच्या उत्थानाचा सदैव प्रयत्न केला त्यामुळे आजचा हिंदु धर्म जिवंत आहे. हजारो वर्षांची परंपरा हिंदू धर्माला लाभली आहे .संस्कार ,सदाचार , विनयशीलता ,नाविन्यपूर्ण विचारांची देवाणघेवाण याची शिकवण  संतांनी  दिली .असे वसंत यादव यांनी सांगितले .
आज समाजात आधुनिक विचार प्रवाहाचा संचार झालेला आहे .आपण सर्वांनी कालानुरूप आपल्या मध्ये बदल घडवून आणणे अभिप्रेत आहे .आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण आपली प्रगती साधने गरजेचे आहे .शिक्षण हे परिवर्तनाची जननी आहे .समाजाच्यात बदल घडवून आणण्यासाठी आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण द्या .त्याद्वारे आपली प्रगती वाऱ्याच्या वेगाने साधली जाईल . आज बहुजन घटकात शिक्षण प्रेम वाढीस लागले आहे ही आनंदाची बाब आहे .आज कुंभार समाजातील विदयार्थीनी विविध क्षेत्रात आपले नावलौकिक   मिळवला आहे .हीआनंदाची बाब आहे असे वसंत यादव यांनी सांगितले .
सदरच्या कार्यक्रमासाठी स्थानिक व मुंबई मंडळाची पदाधिकारी  .अशोक अंजर्लेकर , अनिल पालकर , लक्ष्मण प्रबळकर ,सौ .रचना नांदिवकर ,समीर कुडेकर , अश्विनी आंजर्लेकर , विश्वजीत लांजेकर व शरद चिमावेकर उपस्थित होते .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती परबळकर यांनी केले .
गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त गालसुरे कुंभार समाजाने तीन दिवस ज्ञानेश्वरी पारायण,दिंडी सोहळा , भजन ,कीर्तन ,विविध गुण दर्शन स्पर्धा ,महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ ,सत्यनारायण महापुजा या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा