तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना : पाणी टंचाईचा चेंडू पाटबंधारे विभागाकडे
शासन कृत्रिम पाणी टंचाई करून खेळत आहे नागरीकांच्या जिवाशी
शासनाचे लघु पाटबंधारे विभागाचे मार्फत टंचाईच्या कार्यकाळात पाभरे धरणाचे दुरूस्तीचे काम हाती घेऊन धरणातील बहुतांश पाणी विसर्ग केल्याने पाभरे धरणावर अवलंबून असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना आता पाण्याअभावी ठप्प झाल्या आहेत याचा मोठा फटका तोंडसुरे नळ पाणी पुरवठा योजनेवर पडला आहे या योजनेवर अवलंबून असलेली १० गावे आणि ४ वाड्याना होत आसल्याने टंचाई परिस्थीतीवर मात करण्यासाठी उपविभागीय आधिकारी प्रविण पवार यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागानी धरणाचे दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने टंचाई सदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे .आलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करून लघु पाटबंधारे विभागाने संबंधीत गावाना पाणीपुरवठा सुरळीत सुरु ठेवावा असे स्पष्ट आदेश दिले. यावेळी तहसीलदार शरद गोसावी, अे.पी.आय. प्रविण कोल्हे, ग.वि.अ. प्रभे, ग्रा.पा.पु. उपअभियंता गांगुर्डे, लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता एस.एस् शिंदे , आर. व्हि. चितळकर , कमेटीचे अध्यक्ष महादेव पाटील,उपाध्यक्ष मनोज नाक्ती,सचिव सखाराम पवार, उप सरपंच जनार्धन गाणेकर,अंकुश गाणेकर, सरपंच महादेव भिकू पाटील, श्रीमती धोंडीबाई चाळके, वनिता खोत, जंगम,अनिल बसवत, महादेव म्हात्रे, शेखर खोत, रियाज फकीह, नथुराम खोत आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कांदळवाडा, निगडी,तोंडसुरे,सकलप खारगाव खुर्द , रेवली, बनोटी, गणेशनगर, वरवठणे, आगरवाडा, पेडांंबे हि १० गावे आणि जंगमवाडी,तोंडसुरे बौद्धवाडी, वरवठणे कोंड,आगरवाडा बौद्धवाडी ह्या वाडयाना पाणी टंचाईची झळ पोहचत आहे.
धरणाची दुरुस्ती सापडली आचारसंहीतेच्या कचाट्यात पाटबंधारे विभागाचा दावा
पाभरे धरण गळती व दुरुस्ती २०१७ चे तारांकीत प्रश्नामुळे दुरुस्ती करण्यात येत आहे. गेट बंद आसल्याने सव्हील वर्क चे अंदाजपत्रक बनविणे अशक्य झाले, निवडणुकीपूर्वी टेंडर कॉल करूनही ठेकेदार न आल्याने टेंडरची कार्यवाही थांबली आहे. महसुल विभागाकडून पाण्याचे समस्येसाठी आचार संहीतेचे शिथीलीकरण व्हावे ह्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
-एस्.एस्. शिंदे .स. अ. श्रेणी १, पाटबंधारे विभाग कोलाड.
शासन कृत्रिम पाणी टंचाई करून खेळत आहे नागरीकांच्या जिवाशी
संजय खांबेटे : म्हसळा
झालेल्या बैठकीत पाटबंधारे विभागानी धरणाचे दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने टंचाई सदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे .आलेल्या तांत्रिक अडचणींवर मात करून लघु पाटबंधारे विभागाने संबंधीत गावाना पाणीपुरवठा सुरळीत सुरु ठेवावा असे स्पष्ट आदेश दिले. यावेळी तहसीलदार शरद गोसावी, अे.पी.आय. प्रविण कोल्हे, ग.वि.अ. प्रभे, ग्रा.पा.पु. उपअभियंता गांगुर्डे, लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता एस.एस् शिंदे , आर. व्हि. चितळकर , कमेटीचे अध्यक्ष महादेव पाटील,उपाध्यक्ष मनोज नाक्ती,सचिव सखाराम पवार, उप सरपंच जनार्धन गाणेकर,अंकुश गाणेकर, सरपंच महादेव भिकू पाटील, श्रीमती धोंडीबाई चाळके, वनिता खोत, जंगम,अनिल बसवत, महादेव म्हात्रे, शेखर खोत, रियाज फकीह, नथुराम खोत आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कांदळवाडा, निगडी,तोंडसुरे,सकलप खारगाव खुर्द , रेवली, बनोटी, गणेशनगर, वरवठणे, आगरवाडा, पेडांंबे हि १० गावे आणि जंगमवाडी,तोंडसुरे बौद्धवाडी, वरवठणे कोंड,आगरवाडा बौद्धवाडी ह्या वाडयाना पाणी टंचाईची झळ पोहचत आहे.
पाभरे धरण गळती व दुरुस्ती २०१७ चे तारांकीत प्रश्नामुळे दुरुस्ती करण्यात येत आहे. गेट बंद आसल्याने सव्हील वर्क चे अंदाजपत्रक बनविणे अशक्य झाले, निवडणुकीपूर्वी टेंडर कॉल करूनही ठेकेदार न आल्याने टेंडरची कार्यवाही थांबली आहे. महसुल विभागाकडून पाण्याचे समस्येसाठी आचार संहीतेचे शिथीलीकरण व्हावे ह्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
-एस्.एस्. शिंदे .स. अ. श्रेणी १, पाटबंधारे विभाग कोलाड.
शासनाने गांभीर्याने घ्यावे अन्यथा आंदोलनशासनाचा महसुल, लघु पाटबंधारे कोलाड, ग.वि. अ. म्हसळा, ग्रा.पा.पुरवठा विभाग हे सर्व विभाग नागरीकाना वेढीस धरत आहे. पाणी टंचाई सारखा ज्वलंत विषयात हेतुपुरस्कर विलंब होत असेल तर आंदोलनाने उत्तर द्यावे लागेल .,-महादेव पाटील , अध्यक्ष तोंडसुरे प्रा. नळ योजना

Post a Comment