म्हसळ्यात समतल चराचे काम युद्धपातळीवर


२५० हेक्टर जागेत समतल चर मारणार ; पाण्याचा साठा वाढणार 

म्हसळा : महेश पवार
राज्य शासनाने पाणी आडवा पाणी जिरवा या मोहिमेला सुरुवात करून पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पाणलोट क्षेत्राअंतर्गत समतल चर मारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठा वाढण्यास मदत होणार आहे . त्यातील म्हसळा तालुका कृषी विभागाने घूम , दगडघूम , कुडगाव या गावांमध्ये २५० हेक्टरचे जागेत समतल चर मारण्याचे काम म्हसळा तालुका कृषी विभागाने हाती घेतला आहे . 

म्हसळा तालुका कृषी विभागाचा एक पाऊल पुढे
या कामासाठी शासनाने अंदाजे सव्वा कोटी निधीचा वापर करीत भूगर्भातील पाण्याचा जल साठा वाढवण्याचा काम म्हसळा तालुका कृषी विभाग करताना दिसत आहे . डोंगरमाथ्यावरून वेगाने वाहात येणा - या पावसाच्या पाण्याची गती कमी करून ते पाणी त्या चरामध्ये थांबण्याचा काम केले जाते . त्याचबरोबर डोंगरमाथ्यावरील पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणावर जमिनीची होणारी धूप थांबली जाते . पर्यायाने जमिनीचा कस वाढण्यास मदत होते . वाहात येणारे पाणी चरामुळे अडकून राहून जमिनीमध्ये पाणी मुरण्यास तयार होतो . पडीक जमीन उत्पादन सक्षम बनवून काही प्रमाणात हे क्षेत्र सुपीक होऊन लागवडी खाली आणली जाते . समतल चरामुळे उपचार योग्य पडिक सीमा तांत्रिक जमिनीचा विकास प्रभावीपणे होतो . यासाठी तालुक्यामध्ये डोंगराळ भागात म्हसळा कृषी विभागाने धोरणात्मक अंमलबजावणी करून समतल चर मारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे . त्या समतल चरांचा या ३ गावांमध्ये पाणी साठा होण्यासाठी चांगला उपयोग होणार आहे . भूगर्भातील पाण्याचा साठा वाढल्याने होणारी पाणीटंचाईही कायम दूर होण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न होऊ शकतो . 


काय आहे समतल चर...?
पाणलोट क्षेत्रामधील शेतीस अयोग्य असलेल्या पडिक व अवनत जमिनीमध्ये प्रामुख्याने मृद आणि जलसंधारण करण्यासाठी सलग समपातळी चर कार्यक्रम राबविला जातो . यामध्ये ० ते ३३ टक्के ऊताराच्या जमिनीवर ० . ६०मी . रुंद व ० . ३० मी . खोल तसेच ० . ६० मी . रुंद व० . ४५ मी . खोल या आकाराचे सलग समपातळी चर येतात . त्या मॉडेल निहाय व जमिनीच्या उतारानुसार चराची लांबी ८३३ मी . ते २१७४ मी . आहे . आखणी केल्याप्रमाणे० . ६० मी . व ० . ३० मी . अथवा ० . ४५ मी . खोलीचे सलग समतल चर खोदुन उताराच्या बाजूस मातीचा बांध  भराव  घालून चराचे काम मंजूर मॉडेल प्रमाणे चराची लांबी व मधील गॅप सोडली जाते . दोन चरामधील सोडलेली गॅप एकाखाली एक येणार नाही हे पाहून स्टेंगर्ड पद्धतीने खोदून . मातीच्या भरावावर स्थानिक झाडे झुडपांचे व गवताचे बियाणे पावसाळ्याच्या सुरुवातीस पुरेसा ओलावा पाहून पेरण्यात आले . साधारणपणे प्रति हजार रनिंग मीटर लाबीमध्ये ० . ३० मी . खोलीच्या चरामध्ये १८०घ . मी . व ० . ४५ मी . खोलीच्या चरामध्ये २७०घ . मी . पाणी साठा होतो . सलग समतल चराचा सलग१० हेक्टरचा गर असल्यास अशा गटाभोवती गुरे प्रतिबंधक चर खोदण्यात येतो . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा