श्रीवर्धन : जसवली रुग्णालय परिसरात मगरीचा संचार


श्रीवर्धन : जसवली रुग्णालय परिसरात मगरीचा संचार
दोन तास मगर पकडण्याचा थरार ; अखेर प्राणीमित्रांना यश 

श्रीवर्धन प्रतिनिधी
तालुक्यातील जसवली येथील रुग्णालय परिसरात बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मगर दिसल्याने एकच खळबळ उडाली . रात्री ९ ते १० वाजेपर्यंत जसवली गावाशेजारी असणा-या शासकीय रुग्णालयाच्या परिसरात मगरीचा शोध सुरू होता . यावेळी मगर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी रात्रीच्यावेळी गर्दी केली होती . धावपळ सुरूच असताना एक दीड तासाच्या झटापटीनंतर मगर पकडण्यात प्राणीमित्रांना यश आले . मात्र , ही मगर येथे आली कशी हा प्रश्न गावक - यांचा अद्याप अनुत्तरीत राहिला . जसवली गावाशेजारी रानवली घरण व जसवली तलाव हे दोन पाण्याचे ठिकाण ब-याच अंतरावर आहेत . एरवी गोड्या पाण्यात वास्तव्य असणारा प्राणी अचानक एवढ्या मोठ्या जमिनी क्षेत्रात कसा , असा प्रश्न उपस्थित केला जात आहे . अद्याप पर्यंत जिल्ह्यातील महाड येथे मगर पाहायला मिळत होते , सावित्री खाडीतील रासायनिक प्रदूषण , शहराच्या नाल्यांतून नदीत शिरणारी घाण व त्यामुळे माशांचा अभाव आणि वाढत्या तापमानामुळे मगरीचे स्थलांतर होऊ शकते , याच परिणामी जसवली तलावातील पाणी आटल्याने व अधिक उष्णतेमुळे तलावातील मगरीने स्थलांतर केल्याचे वनविभागाकडून बोलले जाते . महाड शहराला सावित्री , गांधारी व काळ या तीन नद्यांनी वेढले आहे . एकीकडे नद्या व दुसरीकडे मुंबई गोवा महामार्ग यामुळे नदयांचे विहंगम दृष्य बघत येथून पर्यटक प्रवास करीत असतो . गेल्या काही वर्षात या नद्यांमधील विशेषत सावित्री नदीतील मगरींचा संचार पाहणे हा पर्यटकांचा एक टूरिस्ट पॉइंट ठरला आहे . काठावर तोंड पसरून बसलेल्या मगरी , पाण्यावर पोहताना तिचे दिसणारे शरीर व पाण्यावरच्या हलक्या लाटा पाहताना पर्यटक व लहान मुलांना नेहमीच कौतुक वाटत आले आहे . मात्र , हे चित्र जसवली येथे दिसल्याने गावातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे . जसवली गावालगत असणा - या शासकीय रुग्णालय परिसरात ७ फूट तीन इंच लांबीची व अंदाजे ९० किलो वजनाची मगर सापडली . याची माहिती मिळताच प्राणी मित्र विशाल नागवेकर , अनिरुद्ध नागवेकर , प्रसाद अदावडे व ग्रामस्थांच्या मदतीने त्या मगरीला दोरखंडाच्या सहाय्याने बांधल्यानंतर याची माहिती तत्काळ श्रीवर्धन वनविभागाला देण्यात आली . श्रीवर्धन वनविभागाचे वनपाल आर . जी . गायकवाड , वनपाल सी . एस . मगर , वनरक्षक पी . डी . गजेवार , वनरक्षक ए . यु . नागरगोजे अधिकारी व कर्मचा - यांनी मगर ताब्यात घेऊन महाड खाडीमध्ये मगरींच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा