संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
तालुक्यातील जनतेचे रस्ते, पाणी, विज, आरोग्य, शिक्षण ,एस.टी व पाणी टंचाई बाबत निर्माण झालेल्या गंभीर समस्या या बाबत विविध खाते प्रमुखांजवळ आढावा व चर्चा कार्यक्रम कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हसळा येथील पांचगाव आगरी समाज हॉल मध्ये संपन्न झाला. यावेळी आ. तटकरे यानी म्हसळा करांचे कौतुक करुन स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यानी म्हसळा करांचे प्रेम घेऊन कामे चौकटीत बसवून करावी असे स्पष्ट व मार्मिक निर्देश आ. अनिकेत तटकरे यानी दिले .यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ता. अध्यक्ष समीर बनकर, सभापती छाया म्हात्रे, उप सभापती संदीप चाचले, मधु गायकर, अनिल बसवत, लहूशेठ म्हात्रे, हिंदू समाजाचे शहर अध्यक्ष बाळशेठ करडे, उपविभागीय अधिकारी,श्रीवर्धन प्रविण जानू पवार, तहसीलदार शरद गोसावी , पोलीस स्टेशनचे अे.पी.आय. प्रविण कोल्हे, प्रभारी गट विकास अधिकारी व्यंकट तरवडे, ग्रा.पा.पु.विभागाचे उप- अभियंता शिवराज गांर्गुडे,विविध खातेप्रमुख , तलाठी, ग्रामसेवक, उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील पाणी टंचाईच्या अनुषंगाने सुरु असलेल्या, पूर्ण झालेल्या व प्रगती पथावरील पाणी पुरवठा योजना, म्हसळा नगरपंचायतीची पा. पु. योजना, जि.प. व सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, लघुपाटबंधारे विभागाची संदेरी, पाभरे येथील धरणे, मेंदडी येथील जि.प.पाझर तलाव, एस.टी, म.रा.वि. वि.कंपनी. शिक्षण विभाग, आरोग्य आदी विषयांबाबत साधक बाधक चर्चा झाली.
म्हसळा तालुक्यात प्रशासकीय आधिकारी वरचठ झाले असल्याचा महत्वाचा विषय चर्चेला आला व काल गुरवार दिं .३० मे रोजी कार्यालयीन कालावधीत पूर्ण वेळ उप- कोषागार कार्यालय बंद होते हा धक्कादायक विषय पुढे आला असता . उप- कोषागार विभागाचे प्रशासकीय अधिकारी तहसीलदार शरद गोसावी यानी उप- कोषागार अधिकारी मा.रा.पवार हे ३३ कोटी वृक्ष लागवडीचे कामाला गेले होते असा धक्कादायक खुलासा केला.
आज तालुक्यातील विकास कामांबदल होत असलेली चर्चा ही सुमारे ४ वर्षानी होत आहे. त्यामुळे आमचे स्थानिक लोकप्रतिनिधीना व आपणाला नव्याने आहे. पुढील चर्चा अशाच पध्दतीने काही महिन्याचे कालावधीत घेऊ या , राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे राष्ट्रीय चिटणीस व नवनिर्वाचित खासदार सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून सुध्दा एखादी बैठक घेतली जाईल आमचे म्हसळाकर जेवढे शांत तेवढे प्रक्षोभकही आहेत याची जाणीव असुद्या असे अत्यंत मृदु भाषेत आ. तटकरे यानी प्रशासकीय अधिकाऱ्याना संकेत दिले.
Post a Comment