सुनील तटकरेंच्या विजयाने श्रीवर्धनमध्ये जल्लोष


श्रीवर्धन : प्रतिनिधी
रायगड लोकसभेसाठी निवडणुकीत आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर श्रीवर्धन परिसरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला . श्रीवर्धन मतदारसंघात जवळपास ३७ हजारांनी सुनील तटकरे यांनी आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे . २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत सुनील तटकरेंचा २११० मताने निसटता पराभव झाला होता , २३ मे रोजी मतमोजणीला सुरुवात सकाळपासून झाली होती , निकालाकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले होते . रायगडचा राजा कोण होणार , रायगडवर आपली सत्ता स्थापन कोणाची होणार , यासाठी प्रत्येक फेरीमध्ये कोण किती मतांनी अघाडीवर आहे , हे सतत पाहिले जात होते . दोन्ही उमेदवार हे अगदी प्रत्येक फेरीमध्ये थोड्याफार मतांनी आघाडी मिळवित होते . दोन्ही उमेदवारांमध्ये मताची अत्यंत चुरस होत होती . त्यामुळे रायगडमधून कोण विजयी मिळविणार , याची वाट कार्यकर्ते पाहात होते . अखेर सुनिल तटकरे हे निवडून आल्याचे जाहीर झाले. ही बातमी श्रीवर्धनमध्ये समजताच शहरामध्ये जल्लोष केला . श्रीवर्धन बाजारपेठ , शिवाजी चौक , दादर पुल , जुना एसटी स्टैंड , सर्व आळी , पाखाडी , तसेच प्रत्येक नाक्या नाक्यावर व जीवना कोळीवाडा या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली . कार्यकत्यांनी मोटारसायकलने विजय रॅली काढली . काही ठिकाणी तर गुलालाची उधळणसुद्धा करण्यात आली . श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये रायगडच्या नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांना अघाडी मिळवून दिली आहे . सुनील तटकरे यांनीसुद्धा श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये कोट्यवधींची विकासकामे केल्याची ही जणू काही पोचपावती जनतेने दिली आहे . अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते आणि पदाधिका - यांमधून व्यक्त करण्यात आली . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा