भापट संघर्ष बौद्धजन युवा मंडळ तर्फे भव्य बुद्ध मुर्तीची प्रतिस्थापना.



भापट : प्रतिनिधी
               २२ मे २०१९ रोजी  संघर्ष बौद्धजन युवा मंडळ भापट स्थानिक व मुंबई आणि माता रमाई महिला मंडळ भापट यांच्या वतीने संयुक्त जयंती व भव्य बुद्ध मुर्ती प्रतिस्थापना करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित म्हसळा तालुका पंचायत समिती अध्यक्ष गजानन साळवी, चिटणीस विठोबा पवार, सभेचे अध्यक्ष लक्ष्मण मोहिते ,माजी तालुका अध्यक्ष हरिश्चंद्र मोहिते,  विनोद येलवे, युवा समिती मुंबई म्हसळा तालुका मुबंई अध्यक्ष, पुज्य भंते आयु. शांतीबोधी, ज्येष्ठ नामदेव मोहिते, नथुराम घडशी, सत्तार नजिरी, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र कुवारे, संघर्ष युवा मंडळाचे उपाध्यक्ष सागर मोहिते प्राथमिक शिक्षक जयसिंग बेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी भापट गावचे माजी पोलिस पाटिल मुक्तार नजिर व आयु. सुशांत मोहिते यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
                 यावेळी पुज्य भंते  आयु. शांतीबोधी यांच्या मार्गदर्शनाखाली  बुद्ध मुर्तीची पुजा व प्रतिस्थापना करण्यात आली. अडिच फुट बुध्द मूर्ती मंडळाच्या वतीने घेण्यात आली. गावातून प्रत्येक घराघरात मूर्तीचे पुजन करण्यात आले पुष्प फुल अर्पन करून बुध्दांना वंदन करण्यात आले.यावेळी शांतीबोधी यांचे प्रभावी प्रबोधन झाले. पंचशिल तत्वे दैनंदिन जीवनातील महत्व काय आहे त्यांनी उदाहरणासह पटवून सांगितले. गजानन साळवी साहेब यांनी तालुका कार्यकारिणींचे कार्य आणि भापट बौद्धजन मंडळाचे कार्य उत्तमरित्या आहे, याची सांगड घालु़न संघर्ष बौद्धजन युवा मंडळाला शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षक यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, भापट गावातील आम्ही  पाच समाज एकत्र येऊन वर्षभरातील सर्व कार्यक्रम गुण्यागोविंदाने साजरे करतो. सर्व समाजाने एकत्र राहुन गावची एकता टिकवून ठेवली आहे, असेही सांगितले. महिला मंडळ सदस्या सोनाली संदिप मोहिते यांनी हि मनोगत व्याक्त करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.यावेळी इतरही  संघर्ष मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. महेश मोहिते, सागर मोहिते, प्रतिक मोहिते, संदेश मोहिते, नरेश मोहिते, चंद्रकांत मोहिते, सुरेश पवार, हरिश्चंद्र मोहिते, गणेश मोहिते, संदिप मोहिते, सुनिल मोहिते, निलेश पवार, विवेक मोहिते, निमेश पवार, सिराज नजिर , कमळेश बेटकर, सुहेल नजिर, माहिल नजिर, महिला प्रतिनिधि - वंदना मोहिते, ग्रामपंचायत सदस्या वंदना बबन मोहिते, दिपिका मोहिते, पल्लवी मोहिते, मेघना मोहिते, सोनाली मोहिते, सुप्रिया मोहिते, पुजा मोहिते, मंगल पवार, अरुणा मोहिते, धर्मी मोहिते, चेतना मोहिते, भारती मोहिते, शोभा मोहिते, माधवी मोहिते आदी प्रतिनिधि उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नरेश मोहिते यांनी वस्तुरुपात बैठक व्यवस्थेसाठी सतरंजी साहित्य बौद्ध विहारासाठी भेट दिले. धम्मदान . अंकुश कलबटे आणि जयसिंग बेटकर यांनी प्रत्येकी १००१ रु. या कार्यक्रमासाठी भेट दिले. या कार्यक्रमासठी  संघर्ष युवा मंडळ भापट यांनी खुप परिश्रम घेतले. यावेळी सुसज्ज भोजन व्यवस्था करण्यात आली होती.
                   कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश मोहिते यांनी केले. स्वागत संदिप मोहिते यांनी केले. सुत्रसंचालन प्रतिक मोहिते यांनी केले. व आभार प्रदर्शन संदेश मोहिते यांनी केले. ग्रामस्थ व महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा