संजय खांबेटे : म्हसळा
लोकसभा निवडणुकीत ३२- रायगड लोकसभा मतदारसंघासाठी आज झालेल्या मतमोजणीत अंतिमत: राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सुनील तटकरे यांना ४,८६,९६८ इतकी मते आणि दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेचे अनंत गीते ४,५५,५३० यांना इतकी मते मिळाली. सर्वाधिक मते मिळालेल्या सुनील दत्तात्रेय तटकरे यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांनी विजयी घोषित केले. याप्रसंगी त्यांना निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्रही देण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक रवींद्र सिंह, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने उपस्थित होत्या.
आज नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरु होती. मतमोजणीच्या एकूण ३० फेऱ्या पार पडल्या.
सर्व उमेदवारांना अंतिमत: मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत.
अनंत गीते (शिवसेना) ४५५५३०
सुनील तटकरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी) ४८६९६८
मिलिंद साळवी ( बहुजन समाज पार्टी ) ६३५६
गजेंद्र तुरबाडकर (क्रांतिकारी जयहिंद सेना) २१९२
नथुराम हाटे (बहुजन मुक्ती पार्टी ) १४४१
प्रकाश कळके ( भारतीय किसान पार्टी) ८२३
सुमन कोळी (वंचितबहुजन आघाडी ) २३१९६
संदीप पार्टे ( बहुजन महा पार्टी) १४८२
अविनाश पाटील (अपक्ष) ४६८९
अर्जुन घाग ( अपक्ष) १४१७
मधुकर खामकर ( अपक्ष ) १०४९
मूनफ्फर चौधरी (अपक्ष) १२१५
योगेश कदम (अपक्ष) १४७६
सुनील पी तटकरे (अपक्ष) ४१२६
सुनील एस तटकरे (अपक्ष) ९७५२
सुभाष पाटील (अपक्ष) १२२६५
पोस्टल मते
एकूण ११४९० मते नोटाला पडली. पोस्टल मतदानात २५८८ मते अनंत गीते यांना तर २४०५ मते सुनील दत्तात्रेय तटकरे यांना तसेच १५४ मते वंचित बहुजन आघाडीच्या सुमन कोळी यांना पडली. इतर पोस्टल मते पुढीलप्रमाणे
मिलिंद साळवी ( बहुजन समाज पार्टी ) ६३५६
गजेंद्र तुरबाडकर (क्रांतिकारी जयहिंद सेना) ५
नथुराम हाटे (बहुजन मुक्ती पार्टी ) २४
प्रकाश कळके ,( भारतीय किसान पार्टी) १६
संदीप पार्टे ( बहुजन महा पार्टी) १
अविनाश पाटील (अपक्ष) ३
अर्जुन घाग ( अपक्ष) १
मधुकर खामकर ( अपक्ष ) ०
मूनफ्फर चौधरी (अपक्ष) ४
योगेश कदम (अपक्ष) ६
सुनील पी तटकरे (अपक्ष) ६
सुनील एस तटकरे (अपक्ष) ६
सुभाष पाटील (अपक्ष) १
नोटा ५५
मतमोजणी ठीक सकाळी ८ वाजता सुरू झाली. प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी १४ टेबलनिहाय आराखडा तयार करण्यात आलेला होता. सर्वप्रथम ईटीपीबीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम) मते बारकोडद्वारे तसेच पोस्टल बॅलेटद्वारे प्राप्त झालेली मते मोजण्यात आली.पहिल्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर, दुसऱ्या फेरीची व नंतर पुढील फेरींची मतमोजणी सुरू करण्यात आली.

Post a Comment