टीम म्हसळा लाईव्ह
लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षातून एकही उमेदवार उभा न करता मोदी आणि भाजपच्या विरोधात रणशिंग फुंकणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर सभा घेऊन वास्तव परिस्थिती दाखवून लोकांच्या मनात कुतूहल निर्माण केलं. त्यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेतल्याने माझा विजय नक्की झाला आहे, असे उद्गार तटकरे यांनी काढले.
लोकांच्या मनात राज ठाकरेंविषयी ग्लॅमर निर्माण झालंय. त्यांच्या मांडणीमुळे लोकांना वास्तविक परिस्थिती लवकर कळण्यास मदत झाली. २०१४ ला नामसाधर्म्यामुळे माझा पराभव झाला; मात्र यंदा आम्ही सगळी खबरदारी घेतली होती. यंदा मला विजयापासून कोणीही रोखू शकत नाही, असंही तटकरे म्हणाले. निवडणूक आयोग पंतप्रधान मोदींना नोटीस बजावू शकतो तर आयोग कुणालाही नोटीस बजावू शकतो. मनसे आयोगाला योग्य ते उत्तर देईल, असंही तटकरे म्हणाले.

Post a Comment