सुनिल तटकरे यांच्या विजयाने म्हसळ्यात आघाडीचा जल्लोष



 कार्यकर्त्यांची मेहनत फळाला आली - तालुका अध्यक्ष समिर बनकर

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

    रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, शेकाप मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी शिवसेनेचे अनंत गीते यांचा पराभव करून 2014 च्या निवडणुकीतील एकवीसशे मतांनी झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे.
जिह्यात सर्वत्र जल्लोष साजरा होत आहे यानिमित्ताने सुनिल तटकरे यांच्या विजयाची बातमी समजतात म्हसळ्यात कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली. शहरात, गल्ली बोलात, गावागावात, नाक्यावर फटाके फोडून व मिरवणूक काढून... कोण आला रे कोण आला राष्ट्रवादीचा वाघ आला.., तटकरे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है...अशा घोषणा देत म्हसळा शहर दुमदुमून निघाला. आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेली अहोरात्र मेहनत कामी आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. 
विजयी जल्लोष साजरा केल्यानंतर तालुका अध्यक्ष समिर बनकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आमचे नेते सुनिल तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गाववाडी वस्तीवर केलेल्या विकास कामांची पावती यावेळी जनतेने तटकरे साहेबांना दिली तसेच आघाडीच्याकार्यकर्त्यांनी आहोरात्र घेतलेली मेहनत फळाला आली त्याचबरोबर पराभूत झालेले शिवसेनेचे खासदार यांना त्यांच्या निष्क्रियातेचा फटका बसला असल्याचे बनकर यांनी सांगितले. तटकरे साहेबांच्या विजयात महत्वाची भूमीका बजावणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनींचे व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार देखील तालुका अध्यक्ष समिर बनकर यांनी मानले.
विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आय, शेकाप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेनेच्या गोटात मात्र अस्वस्थता....

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुनिल तटकरे यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करीत असताना म्हसळ्यात शिवसेनेच्या गोटात मात्र अस्वस्थता दिसून येत होती. तटकरे आघाडीवर असल्याच्या बातम्या येऊ लागल्यानंतर मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते बाहेर दिसत नव्हते तर पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात देखील शुकशुकाट असल्याचे दिसून येत होते. शिवसेनेचे नेते अनंत गीते पराभूत झाल्याने हा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

 
   तमाम मतदार बंधू-माता-भगिनी, जेष्ठ -युवा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिलेल्या मतदान रूपी आशिर्वादामुळेच सुनिल तटकरे साहेबांचा विजय झाला आहे आणि हा विजयाचा आनंद साजरा करावयास मिळाला आहे त्याचबरोबर मागील दीड महिन्यापासून प्रचाराच्या रणधुमाळीत स्वत:ला कायम झोकून देऊन प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी साहेबांना विजयी होणेसाठी पक्षाच्या ध्येय-धोरणांशी एकनिष्ठ राहून केलेल्या मेहनतीला अखेर यश आले आहे.
श्री.सतिश रा.शिगवण, अध्यक्ष - वरवठणे गण रा.कॉं.पार्टी

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा