श्रीवर्धन : संतोष सापते
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या हद्दीतील स्मशान भूमी नूतनीकरणास सुरुवात झाली आहे .नगरपरिषदेने अंदाजे 17,10,4875 रुपये ची तरतूद सदर कामासाठी केली आहे.समुद्र लगतच्या जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने विश्रांतीगृहा जवळच्या स्मशान भूमीचे काम बऱ्याच दिवसापासून रखडले होते .त्याच सोबत शहराच्या हद्दीतील इतर स्मशानाची अवस्था बिकट झाली होती . .पावसाळी स्मशान भूमीत सर्वत्र पाणी व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते .त्याकरणे अंतविधीत असंख्य अडचणी निर्माण होत होत्या .तसेच स्मशानभूमीला संरक्षक भिंत नसल्याने पावसाळी गवत व कचरा यांचा साठा मोठ्या प्रमाणात जमा होत होता .त्या कारणे धार्मिक विधी करतांना उपस्थित नातेवाईकास स्मशानभूमीत थांबणे अशक्य झाले होते.परिणामी जनतेत असंतोष निर्माण झाला होता .
स्मशानभूमीच्या प्रश्ना कडे नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम दैनिक लोकमत च्या माध्यमातून करण्यात आले होते .
आज रोजी स्मशान भूमी नुतनीकरण निधी
खालचा जीवना 5059746 रुपये ...चार शववाहिनी
विश्रांती गृहाच्या जवळ 3766478 रुपये ...तीन शववाहिनी
इंदिरा नगर 1748292 रुपये ...दोन शववाहिनी
दांडा तरीबंदर 3236540 रुपये ...तीन शववाहिनी
मठाचा गवंड 3293819 रुपये ...चार शववाहिनी
अशा प्रकारे नुतनीकरण निधीचा चा उपयोग करण्यात येणार आहे .
श्रीवर्धन शहरातील जनतेला पावसाळी स्मशानात असंख्य अडचणीला सामोरे जावे लागत होते त्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनने सकारात्मक भूमिका घेऊन भरभक्कम निधीची तरतूद स्मशान नुतनीकरणा साठी केली आहे .त्या साठी आम्ही वेळोवेळी पाठपुरवठा केला आहे .
-प्रीतम श्रीवर्धनकर (नगरसेवक तथा विरोधीपक्ष नेते श्रीवर्धन नगरपालिका )
विकासाचा दृष्टिकोन ठेवत आम्ही नगरपालिकेत कार्यरत आहोत .सुनील तटकरे साहेब याच्या मार्गदर्शनाखाली श्रीवर्धनच्या जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव तयार आहोत .स्मशान भूमी नुतनीकरणा साठी चांगला निधी उपलब्ध करण्यात आम्ही यशस्वी झालो .
-दर्शन विचारे (नगरसेवक तथा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस श्रीवर्धन)
स्मशान भूमी नुतनीकरण योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने केले जाईल .सदर कामे कुठे ही त्रुटी किंबहुना उणीवा राहणार नाही याची नगरपालिका प्रशासन काळजी घेईल .स्मशान भूमीचा प्रश्न बऱ्याच दिवसाचा प्रलंबीत होता -किरणकुमार मोरे (मुख्याधिकारी श्रीवर्धन नगरपरिषद )

Post a Comment