म्हसळयाचा पारा ३५ वर ठाम, तालुक्यातील बहुतांश जलस्त्रोत्र आटले : टँकरच्या मागणीकडे शासनाचे दुर्लक्ष




संजय खांबेटे : म्हसळा 

    म्हसळ्यात गेले काही दिवस उष्णतामान ३५ अंशावर ठाम आहे. म्हसळा शहरासह तालुक्यात पाणी पुरवठा करणारे बहुतांश स्त्रोत आटल्याने पाणी पुरवठ्यावर परीणाम झाला आहे शहरात व तालुक्यात अनेक ठिकाणी एक दिवसा आड पाणी पुरवठा होत आहे.तालुक्यातील नळ पाणी पुरवठा योजनांचे नैसर्गिक स्त्रोत आटल्यामुळे  त्या बंद झाल्या आहेत. दुसरीकडे टँकरमुक्त म्हसळा तालुक्याला टॅंकरने पाणी देण्यास प्रशासन मात्र हात वर करीत आहे.

   तालुक्यातील कांदळवाडा, देवघर, निगडी,तोंडसुरे,सकलप, खारगावखुर्द,रेवली,बनोटी , गणेशनगर, वरवठणे,आगरवाडा, पेडांंबे, जंगमवाडी,तोंडसुरे, बौद्धवाडी, वरवठणे कोंड, आगरवाडा, दुर्गवाडी, चिखलप , देहेन, तुरूंबाडी, पांगळोली, कुडगांव, काळसुरी, घोणसे ( वडाचीवाडी, म्हशाची वाडी, केळीवाडी, विचारे वाडी व बौध्द वाडी) या . सर्व .वाडयांतून टिपकवणी लागली आहे.तालुक्यांतटॅकर ची मागणी जोर धरत आहे.
      तालुक्यात टंचाई ग्रस्त गावांची यादी चाळीसच्या वर होत आसताना १० गावे ४ वाडया ना कृत्रिम पाणी टंचाई करूनही शासन पाणी देण्यास असमर्थ ठरत आहे. कांदळवाडा, निगडी,तोंडसुरे,सकलप, खारगावखुर्द  रेवली,बनोटी , गणेशनगर,वरवठणे,आगरवाडा,पेडांंबे हि १० गावे आणि जंगमवाडी,तोंडसुरे बौद्धवाडी, वरवठणे कोंड,आगरवाडा बौद्धवाडी याना कृत्रिम पाणी टंचाईचा फटका बसला आहे.
 तालुक्यातील नागरीक संतप्त झाले आहेत. कृत्रिम पाणीटंचाई  विरुध्द २१ मे ला तोंडसुरे प्रादेशिक योजनेतील गावांचा मोर्चा शासनाविरूध्द धडकणार आहे. जिल्हा व तालुका  प्रशासनाने पाणी टंचाईवर तोडगा काढणे अपेक्षीत असताना ते मात्र अद्यापही कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त आसल्याचे दिसत आहे. परिणामी ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी पहाटेपासूनच भटकंती करण्याची पाळी आली आहे.
  उन्हाळ्याच्या झळा लागल्या की सर्वजण खडबडून जागे होतात. तहान लागली की विहीर खोदतात. दिवसेंदिवस कमी होणारे पर्जन्यमान, पाण्याचा तुटवडा, ग्लोबल वार्मिंग, पर्यावरणातील बदल, वाढती लोकसंख्या, कमी पडणारा पाणीसाठा, पाण्याचा अपव्यय अशा बर्‍याच गोष्टींमुळे  पाणी टंचाई व दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. या सर्वाला शासन गांभीर्याने घेत नाही असा आरोप तालुक्यातील नागरीकांचा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा