दिघी , आदगावची ‘सुकट' संकटात ; गतवर्षीच्या तुलनेत सुक्या मासळीच्या दरांत वाढ


 दिघी प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील दिघीची 'सुकट' अशी प्रसिद्धी मिळालेली सुकी मासळी विक्री सध्या संकटात आहे . खोल समुद्रातील मासेमारीला मत्स्यदुष्काळ तसेच  मोठ्या माशांचे चढे भाव अशा दोन कारणांमुळे खवय्यांची भिस्त आता सुक्या मच्छीवर आहे . आठवडा बाजारामध्ये सुकी मच्छी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे . दर पावसाळ्यात खवय्यांना सुकी मच्छीचाच आधार असतो . एकेकाळी दिघी बंदरातील मासेमारीमध्ये ओली मच्छी म्हणून कोलिमचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळत असे . त्यासाठी दिवस रात्र कोळी बांधव मेहनत करुण ओली कोलिम समुद्रातून बंदर किनारी सुकवण्यासाठी अनेक ओटे तयार करुण एप्रिल , मे च्या कड़क पाऱ्यात कोलिम सुकवून पुणे , मुंबई सारख्या ठिकाणी सुख्या मासळी बाजारात नेत असत . त्यामुळे दिघी ची 'सुकट ' या नावाने पंचकृषित प्रसिद्ध झाली . औद्योगिकरणामुळे सद्यस्थितित दिघी बंदरात मासेमारी मध्ये सुकट कमी प्रमाणात मिळत असल्याचे दिसून येत आहे . पावसाळ्यातील दीड महिने हा मासेमारी बंदीचा काळ असून या दिवसात मच्छीमार आपल्या बोटी समुद्रकिनारी शाकारून ठेवतात . त्यामुळे मच्छीबाजारात पापलेट , हलवा , कोलंबी , सुरमई , मांदेली व मुशी हे मासे पहावयास मिळत नाहीत . त्यामुळे खाडीतील मच्छी व सुकी मच्छी यावर नागरिकांचा भर असतो . खाडीतील निवटे , खेकडे , तिसर्या तर सुकी मच्छीमध्ये सोडे , खारे , सुके बोंबील , सुकट यांचा समावेश असतो . सोडे हे १३०० रू . किलो दराने विकले जात आहेत . सुकटिचा किलो १०० , १५० ते २०० रु . किलो आहे . खाडीतील खेकडे २०० ते ३०० रू . डझन ( लहान ) तर मोठे खेकडे ४०० ते ६०० रू . दराने विकले जातात . गेल्या वर्षीच्या तुलनेत सुक्या मासळीच्या दरांत सरासरी शंभर ते दोनशे रुपयांची वाढ झाल्याचे चित्र आहे . पापलेट , सुरमई , बांगडा या माशांची आवक घटल्याने या प्रकारातील सुकी मासळी बाजारात उपलब्धच नाही . या सा - यामुळे अस्सल खवय्यांना मात्र , मासळी खाण्याच्या इच्छेला मुरड घालावी लागत आहे . एप्रिल महिन्यात सर्वसाधारणपणे बोलपंचतनच्या बाजारपेठेमध्ये सुक्या मासळीचे आगमन होते . गेल्या वर्षी सुक्या मासळीची आवक चांगली झाल्याने बाजारात दर कमी होते . मात्र , यंदा मत्स्यदुष्काळासारखी परिस्थिती असल्याने सुक्या मासळीची आवक घटली आहे . त्यातच काही मोसमी हवामान बदलाचा फटका सुक्या मासळीला बसला आहे . सुके बोंबील , जवळा , सुकट , कोलंबी आदी मासळी बाजारात उपलब्ध आहे , परंतु पापलेट , सुरमई , बांगडा या सांरखी मोठी सुकी मच्छी समुद्रातील ओल्या मच्छीच्या कमतरतेमुळे उपलब्ध होऊ शकली नाही , असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले . 

मच्छिमार्केटची गरज सुसज्ज मार्केटची कमतरता भासते . विस्तीर्ण समुद्रकिना - यामुळे श्रीवर्धन तालुक्याची आता पर्यटन क्षेत्र म्हणून खास ओळख बनली आहे . मात्र , स्थानिक तसेच पर्यटकांना ओली किंवा सुकी मासळी मिळण्यास दिघी येथे खास ठिकाण नाही . त्यामुळे आदगाव तसेच दिघी येथील मच्छिमारांना मच्छी विकण्यास अडचण येतात . प्रशस्त मच्छिमार्केटची गरज आम्हा कोळी बांधवांना आहे .
 - बाळराम ही खेलोजी , कोळी समाज अध्यक्ष , दिघी . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा