नगरपंचायत हाय... हाय... घोषणांनी म्हसळा दुमदुमले : पाणी संघर्ष समीती तर्फे तहसिल कार्यालयावर मोर्चा


नगरपंचायत हाय... हाय... घोषणांनी म्हसळा दुमदुमले : पाणी संघर्ष समीती तर्फे तहसिल कार्यालयावर मोर्चा : मोर्चेकऱ्यांचा  अपमान करुण मुख्याधिकारी सभेमधूनच खर्ची आपटून फरार 

म्हसळा (निकेश कोकचा )

म्हसळा शहरामध्ये दोन माजी मंत्र्यांनी एकाच  नळ पाणी पुरवठा योजनेचे दोन वेळा उदघाटन करुण देखील म्हसळा शहरातील नागरिकांना भिषण पाणी टंचाईला सामोर जावे लागत आहे. नगरपंचायतीच्या नियोजन शुन्य निर्मित पाणीटंचाई विरुद्ध पाणी संघर्ष समिती व म्हसळा शहरातील नागरीकांतर्फे १४ मे रोजी तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

म्हसळा शहरातील भिषण पाणीटंचाई विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चा मध्ये मोठया प्रमाणात शहरातील महिलांनी रिकामा हंडा घेऊन आपली उपस्थिती नोंदवत शासनाचा लक्ष वेधण्याचे कामा केले. म्हसळा बसस्थानक ते तहसिल कार्यालय पर्यत काढण्यात आलेल्या मोर्चा मध्ये जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, पाणी संघर्ष समीतीचे अध्यक्ष सुशिल यादव, जेष्ठ पत्रकार उदय कळस,पत्रकार बाबू शिर्के, महेश पवार, समितीचे सचिव नदिम दफेदार, सहसचिव गणेश हेंगिष्टे, खजिनदार कांतीलाल जैन, राष्ट्रवादीचे उपजिल्हा अध्यक्ष मुसद्दीक इनामदार,उप तालुका अध्यक्ष शाहिद उकये,कॉग्रेस शहर अध्यक्ष रफी घरटकर, शिवसेना शहर अध्यक्ष अनिकेत पानसरे, समाजसेवक सुरेश कुडेकर, सरोज म्हशिलकर, माजी सरपंच सौ. कळमकर, उपसरपंच जहुर हुर्जुक,दक्षता कमेटी सदस्या अपर्णा ओक, संजना करंबे,जयश्री सपकाळ, सलिम बाक्कर, माजिद हजवाने, मनाली कुडेकर, जयश्री म्हशिलकर, मयुरी गोविलकर, अमृता कळस,लता परबळकर, तन्वी करडे, असलम चणेकर, चेतन जैन, नजीर काजी, शशिकांत घोसाळकर, रफीक दरोगे, कल्पेश जैन, सर्फराज वस्ता,राहूल जैन, बाबू बनकर, मंगेश म्हशिलकर, अशफाक काटेवाडी यांच्यासहीत शहरातील अनेक महिला व पुरुष उपस्थित होते.
संपुर्ण शहर  पाणीटंचाईने ग्रासलेले असतानाच म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव गारवे  मात्र संपुर्ण शहर वाऱ्यांवर सोडून उन्हाळी सुट्टीसाठी गेले आहेत. त्यांच्या जागी आलेल्या  प्र. मुख्याधिकारी समिर जाधव यांनी पाणी संघर्ष सभेत संपुर्ण म्हसळेकरांचा अपमान करूण सभा सुरू होण्याआधिच नायाब तहसिलदार भिंगारे यांच्यासमोर खुर्ची आपटून निघून गेले.प्र. मुख्याधिकारी जाधव यांचा या बेजबाबदार वर्तणामुळे सदर सभेमध्ये त्यांचा  निषेध नोंदवत, वरिष्ठांचा मान न ठेवणाऱ्या अश्यया धीऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची आंदोलनकर्त्यांकडून व्यरण्यात आली.

पाणी संघर्ष समिती तर्फे तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन  पुढील  ७ दिपसांत  पाणी  पुरवठा सुरळीत नाही झाल्यास तिव्र आंदोलन करुण संबधित मुख्याधिकारी यांना नगरपंचायतीमध्येच कोंडून टाळे ठोकण्यात  येईल असे सांगण्यात आले. यावेळी प्रशासना तर्फे नायाबतहसिलदार भिंगारे, नगराध्यक्षा फलकनाझ हुर्जुक, पाणी पुरवठा सभापती दिलीप कांबळे, सहा. पोलिस निरीक्षकअप्रविण कोल्हे आदि उपस्थित होते.


नगरपंचायतीच्या पाणी बाबत लावलेल्या तातडीच्या सभेमध्ये  नगरपंचायतीमार्फत सुरळीत पाणी पुरवठ्या ऐवजी  एक दिवस आड पाणी पुरवठा करण्याचा अबौधिक निर्णयाचा संपुर्ण शहरातून निषेध होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा