वूडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर...

संग्रहीत छायाचित्र

वूडबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर ; अभिषेक पटेल , सोनाली मालुसरे कर्णधार  

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
मध्य प्रदेशचा अभिषेक पटेल आणि महाराष्ट्राची सोनाली मालुसरे यांची दुस-या बीच विश्वचषक यूडबॉल चैम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष आणि महिला संघ कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे . विश्वचषकाचे आयोजन युगांडातील स्पेनाह बीच एनटेबे येथे २५ ते ३१ मे या कालावधीत होत आहे . अभिषेक आणि सोनाली यांना प्रत्येकी तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धाचा अनुभव आहे. बुडबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे महासचिव अजय सोनटक्के यांनी संघाची घोषणा केली . भारतीय संघाचे तयारी शिबिर मुंबईतील वसई बीच येथे सुरू झाले आहे . भारतीय संघ २४ मे रोजी मुंबई येथून युगांडाकडे रवाना होईल , अधिकारी म्हणून वूडबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे कोषाध्यक्ष प्रवीण मानवटकर हे जाणार आहेत . 

भारतीय संघ : हेमंत भाऊ पायेर , सागर सावंत , राजेंद्र पाटील , केतन भापकर , वैभव जगताप , श्रींगी शर्मा , अभिषेक पटेल , गिरीष गदगे , सोनाली मालुसरे , मुग्धा लेले , स्नेहा पटेल , अल्का वांजेकर आणि स्मिता पवार.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा