वाडांबा ता. म्हसळा येथे श्री. राधाकृष्ण मंदीराचा वर्धापन दिन सोहळा संपन्न


संजय खांबेटे : म्हसळा 
    वाडांबा ग्रामविकास मंडळ मुंबईच्या वतीने म्हसळा तालुक्यातील वाडांबा येथे आज श्री राधाकृष्ण मंदीराचा २४ वा वर्धापनदिन सोहळा साजरा झाला. सकाळ पासून भरगच्च अशा सांस्कृतिक कार्यक्रमांत महाभिषेक, श्री राधाकृष्ण पालखी सोहळा, श्री सत्यनारायणाची महापूजा, महाप्रसाद , हळदी कुंकू, शैक्षणिक व क्रिडा स्वर्धा, पारितोषक वितरण, जेष्ठ नागरिकांचा सत्कार, महाआरती, लहान मुलांचे मनोरंजन कार्यक्रम, भजन असा कार्यक्रम झाला, यावेळी  साळविंडा ग्रु. ग्रा.पंचायतीच्या सरपंच सौ. सोनल महेश घोले, उपसरपंच लक्ष्मण महादु कांबळे, सदस्य महेश तुकाराम घोले, सदस्या श्रीमती रमाबाई नथुराम घोले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी . महाराष्ट्र यादव चॅरीटी ट्रस्टचे माजी विश्वस्त श्री. शांताराम घोले, समन्वय समिती सदस्य महादेव तटकरे, वाडांबा ग्राम विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष राणपत महाडिक हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा