श्रीवर्धन संतोष सापते
आजन्म साहित्य व कला यांना आयुष्य समर्पित करून जीवन जगताना नात्याचे ऋणानुबंध निर्माण करत साहित्याची सेवा निरंतर करणारा ज्ञान योगी विनायक कृष्णाजी दाते आज काळाच्या पडद्याआड गेले .अल्पशा आजाराने काल त्यांची प्राणज्योत मालवली .आयुष्याच्या शेवटच्या क्षणा पर्यंत त्यांनी साहित्याची संगत सोडली नाही . समाजाला साहित्याचा ओढा लागावा व त्यातून समाजात चैतन्य निर्माण व्हावे .समाजातील तळागाळातील व्यक्तीला साहित्य सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी घरात वाचनालय चालवणारे दाते हे वेगळे व्यक्तिमत्त्व होते .घरातील रसिक वाचनालय त्यांनी सर्वांसाठी सदैव खुले ठेवले होते .ललित लेख , कथा , कादंबरी ,नाटक, आत्मचरित्र यांचा हजारो चा संग्रह विनायक दाते यांनी आपल्या वाचनलायत ठेवला होता .उत्तम-कथा या मासिकात त्याचे असंख्य लेख प्रसिद्ध झाले .एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून दाते श्रीवर्धन तालुक्यात सर्व परिचत होते .श्रीवर्धन शहरातील प्रत्येक वर्गातील लहान थोर व्यक्तींशी दाते यांचे घनिष्ठ संबंध होते .सदैव हसतमुख असणारे दाते हे एक अजब रसायन होते .वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्याच्या घरात विविध पुस्तकाचे सदैव दर्शन घडत .थोडयाशा मिश्किल पणे आलेल्या पाहुणे मंडळी सोबत त्यांनी केलेला संवाद कायमस्वरूपी लक्षात राहणारा आहे .सदैव आपल्याच जगतात रममाण असून दुसऱ्याच्या सुख दुःखाचा विचार करणारे दाते हे वेगळ्याच धाटणीचे व्यक्तिमत्त्व होते .नियमित श्रीवर्धन मधील देव दर्शन व पुस्तक वाचन हा त्यांचा दैनंदिन जीवनक्रम आयुष्यच्या शेवट पर्यंत निरंतर चालू होता .दुर्दम्य इच्छा शक्ती व महत्वकांक्षा वृत्ती मुळे दाते समर्पित आयुष्य जगू शकले .
तालुक्यात कोकण साहित्य परिषदेची शाखा चालू करण्यासाठी त्यानी प्रचंड कष्ट घेतले .शहरात दिवाळी पहाट ,विविध नाटक , समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात दाते सदैव अग्रणी होते .नगरपालिकेतील अभियंता पदावरील नोकरी सांभाळत समाजसेवेचे व्रत त्यानी सदैव अंगिकारले होते .विनायक दाते चांगले वक्ते ,साहित्यिक व समाज सेवक होते त्यांच्या जाण्याने नक्कीच श्रीवर्धन तालुक्यातील कला क्षेत्रातील एक तारा आजमितीस निखळ ला आहे .दाते यांच्या पश्चात मुलगा ,मुलगी ,सून व जावई असा परिवार आहे .मुलगा गणेश दाते हे पत्रकार आहेत .

Post a Comment