बोर्लीपंचतन महाराष्ट्र बँकेची सुमार सेवा ; ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी


कर्मचा-यांचे वर्तन , इंटरनेट सुविधा ठरतेय डोकेदुखी 

श्रीवर्धन प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे असलेल्या व देशामध्ये बँकींग क्षेत्रामध्ये उत्तम सेवा देणा-या नामांकीत महाराष्ट्र बँकेच्या या शाखेच्या सुमार सेवेने ग्राहक अक्षरक्ष : हैराण झाले आहेत . ग्राहकांसोबत कर्मचारी यांचे सेवेवरुन खटके उडणे , इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याने बँकेचा कारभार बंद असणे , दूर दूरच्या गावाहून येणा-या ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा हेलपाटे मारुनही बँकेतून काम न होणे अशा अनेक समस्यांमुळे बँक ऑफ महाराष्ट्र बोर्लीपंचतन शाखा ग्राहकांची डोकेदुखी ठरत आहे . वरिष्ठदेखील बँकेच्या सुस्त कारभाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्राहकांतून बँकेच्या कारभाराबाबत शिमगा घालत आहेत . वरिष्ठांनी तत्काळ याकडे लक्ष पुरवावे ; अन्यथा ग्राहकच बँकेला टाळे ठोण्याची वेळ येईल , अशी ग्राहकांतून प्रतिक्रीया व्यक्त होत आहे . बोर्लीपंचतन हे मध्यवर्ती बाजारपेठेचे गाव . या ठिकाणी शाखेची आसपासच्या सुमारे २५ खेडेगावातील जनतेची प्रमुख बाजारपेठ म्हणजेच बोर्लीपंचतन बाजारपेठ होय , बोर्लीपंचतन येथे स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र अशा २२ दोन राष्ट्रीयीकृत बँका आहेत . परंतू दोन्ही बँकेमध्ये ग्राहकांना सूचना पूर्ण सेवा केव्हाच मिळत नाही . यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील शाखेची सेवा ग्राहकांची अति डोळेदुखी ठरत आहे . २३ तारखेला असलेली लोकसभा निवडणुकीची मतमोजणीसाठी बँकेचे कर्मचारी नियुक्त होते . यामुळे राष्ट्रीय कामासाठी बँक २२ व २३ असे दोन दिवस कर्मचारी नसल्याने ग्राहकांना सूचना न देता बंद राहणार होती ; परंतू २३ मे रोजी अन्य शाखेतील कर्मचारी बोर्लीपंचतन शाखेमध्ये आल्याने शाखा जेमतेम चालू झाली ; पण शुक्रवार २४ मे रोजी बँक चालू होणे क्रमप्राप्त असतानादेखील बँक  बंदच होती . अनेक ग्राहक यामध्ये दुरुन खेडेगावातून आलेले ज्येष्ठ नागरिक , महिला पुरुष बँक उघडण्याची ताटकळत वाट पाहत होते . पण बँक उघडलीच नाही . पुढे चौथा शनिवार व रविवार बँकेला हक्काची सुट्टी . म्हणजे सलग ५ दिवस बँक बंद . ग्राहकांची महत्वाच्या कामासाठी बँकेमध्ये केव्हाही आले मागील काही महिने पासून वारंवार इंटरनेटअभावी बँकेचे काम बंद असल्याचे फलक लागलेले असतात . बँक याला अद्याप काहीच पर्याय करू शकत नाही याबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड चीड व्यक्त होत आहे . कर्मचा - यांचे ग्राहकांना उद्धटपणे उत्तर दिल्याने भांडणाचे प्रकार देखील वरचेवर होत असल्याने देशामध्ये उतत्म सेवा देणा-या बँकेला सेवा देत नसेल तर शाखाच बंद करा अशी प्रतिक्रीयादेखील ग्राहकांमधून येत आहे . किंवा तत्काळ सेवा सुधारा ; अन्यथा ग्राहकच बँकेला टाळे ठोकतील असा इशारा देण्यात आला आहे . 

...तर शाखा बंद करा !
बँकेच्या कर्मचारी यांचे आम्हा ग्राहकांसोबतचे वर्तन अगदी उद्धट आहेच . शिवाय सुरळीत नियमित सेवा नसताना याबाबत विचारणा केली असता पोलीस ठाण्यात केस देण्याची धमकी शाखाधिकारी देत असतात . सेवा देणे जमत नसेल तर शाखा बंद करून टाका.
 -दत्तात्रेय मुद्राळे , ग्राहक 

आम्ही कर्मचारी मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त होतो २३ मे रोजी रात्री उशिराने घरी परतल्याने आम्हाला सुट्टी मिळाली म्हणून २४ मे रोजी बँक बंद ठेवावी लागली . बँक वैयक्तीक स्तरावर इंटरनेट लवकरच सुरु करित आहे त्यामुळे इंटरनेट मुळे सेवा सुरळीत होवू शेकेल.
-यतीन हैलकर , शखाधिकारी , बँक ऑफ महाराष्ट्र

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा