श्रीवर्धनमध्ये घनकचरा प्रकल्पाचा बोजवारा ; कच-यामुळे नागरीकांच्या आरोग्याला धोका



श्रीवर्धन : भारत चोगले
श्रीवर्धन नगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुन्हा एकदा पेटला आहे . खत निर्मिती होत नाही व घनकचरा प्रकल्पही सुरळीत नाही अशी स्थिती आहे . श्रीवर्धन नगरपालिकेने या प्रकल्पासाठी लाखोरूपये खर्च केले आहेत . प्रशासनाकडून नागरिकांची दिशाभूल सुरू असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे . श्रीवर्धमध्ये शहरीकरण वाढत असल्याने घनकच-याची विल्हेवाट लावण्यासाठी नगर पालिका प्रशासनमार्फत तेथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात आला . २०१४ मध्ये तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते . कोकणातील पहिला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असल्याने चांगलीच वाहवा झाली . मात्र २०१४ पासून प्रकल्पातून खतनिर्मिती काही झाली नाही . श्रीवर्धन मध्ये घनकचरा प्रकल्पाचा कचरा झाला असून त्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी मोठमोठे कच-याचे ढिग जमा झाले आहेत . कोणत्याही प्रकारचे खत निर्मिती केली जात नाही . त्यामुळे तेथील नागरीकांच्या आरोग्याचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही . श्रीवर्धन नगरपरिषदेकडून ठेकेदाराला अभय दिले जात आहे . गायगोठण या ठिकाणी साचलेला ओला आणि सुका कच - यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली असून या ठिकाणी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे . त्याकडे श्रीवर्धन नगरपालिकेचे अक्ष्यम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे . याबाबत समस्त गायगोठणचे मधील नागरिकांने वारंवार केलेल्या लेखी व तोंडी तक्रारीला श्रीवर्धन नगरपरिषेदने केराची टोपली दाखविली आहे . श्रीवर्धन नगरपरिषदेकडून अक्ष्यम दुर्लक्ष केले जात आहे . ठेकेदाराला अभय दिले जात असल्याचेही नागरीकांकडून बोलले जात आहे . श्रीवर्धन नगरपालीकेने जो घनकचरा व्यवस्थापनांतर्गत खतनिर्मिती केंद्र कार्यान्वीत केले आहे ते गेले काही महिने बंद स्थितीत असून संबधीत जागेत गेले काहीं महिन्यापासून संपूर्ण शहरातील कचरा जमा करण्याचे काम चालू आहे . त्या ठिकाणी सध्यस्थितीत शेकडो ट्रक कचरा जमा आहे . मात्र त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही . त्या कच - याच्या साम्राज्यामुळे संपूर्ण वस्तीमध्ये दुर्गंधी पसरली आहे . त्याच प्रमाणे पक्षांच्या विष्ठेचा त्रास पिण्याच्या पाण्यातून नागरिकांना होत आहे . सध्या श्रीवर्धन शहरातील उत्तरेकडील भागातील नागरीक वस्तीमध्ये वेगवेगळया रोगांचा प्रादुर्भाव होत आहे . त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण आहे . तसेच शहरातील वाहतूक करणाच्या कच-याच्या गाड्यांवर कोणतेही झाकण नसते उघड्या गाड्या कार्यान्वीत ठेवलेल्या आहेत . त्यामुळे घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा नेत असताना जाणाच्या रस्त्याच्या दुतर्फा उडालेला कचरा व प्लास्टिक दिसून येत आहे . श्रीवर्धन नगरपालीका प्रशासनाकडून शासनाच्या स्वच्छता अभियान मोहीमेस जाणुनबुजून बगल देण्यात येत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे . तसे निवेदनही नगरपालिकेला दिले आहे . काही दिवसापूर्वी गायगोठण मधील शिष्टमंडळ श्रीवर्धनचे नगराध्यक्ष नरेद्र भुसाणे यांना प्रत्यक्ष भेट दिली . घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी मोठमोठे कच-याचे ढिग झाले असून त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे . शिवाय परिसरामध्ये रोगराई पसरली आहे . याबाबत सविस्तर चर्चा केली . तसेच अनेक वेळा निवेदन दिले . ते मासिक सभेमध्ये का घेतले नाही ? अशा प्रकारे होत असलेल्या अनेक अडचणी त्यांनी नगराध्यक्षा समोर मांडल्या . यावेळी नगराध्यक्ष भुसाणे म्हणाले , श्रीवर्धन शहरातील विविध भागामधून उचलेला कचरा गायगोठण येथील घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी नेण्यात येणा - या घंटागाड्यामधील कचरा रस्त्यावर पडणार नाही . त्यासाठी आम्ही घंटागाड्यामधील कचरा सुरक्षित झाकून नेण्याचे काम करणार आहोत . तसेच येत्या आठ दिवसामध्ये त्याठिकाणी असलेला कचरा दुस - या ठिकाणी नेण्यात प्रयोजन करत आहोत . 

पावसाळा अगदी काही दिवसांवर येवून राहिला आहे , याची कल्पना श्रीवर्धन नगरपरिषदेला दिली आहे . घनकच - याच्या ठिकाणी मोठमोठे कच - याचे ढिगच्या ढिग पडलेले आहेत . त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे . तेथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे . पावसाळ्यापूर्वी या कच - याची विल्हेवाट योग्यपणे लावली गेली नाही तर शहरामध्ये रोगराई पसरली जाईल . नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल .
-प्रितम श्रीवर्धनकर , विरोधी पक्षनेते , श्रीवर्धन नगरपरिषद . 

घनकचरा व्यवस्थापन हा प्रकल्प नसून त्याठिकाणी डम्पिग ग्राउंड तयार झालेले आहे . तेथे कच - याचे मोठमोठे डोगंर तयार झालेले आहे . श्रीवर्धन नगरपालिका व प्रशासने जाणुनबुजून भारत स्वच्छता अभियानाला बगल देण्याचे काम करत आहे . वारंवार संबधीत नागरिकांने तक्रार करून देखील श्रीवर्धन नगरपालिका अक्ष्यम दुर्लक्ष करत आहे . 
-अनिल भुसाणे , श्रीवर्धन ज्येष्ठ नागरिक 

प्रशासनामार्फत शक्य तेवढी कारवाई सुरू आहे . यापुढे सुध्दा सुरू राहील . संबधित ठेकेदाराला नोटीस बजावलेली आहे . श्रीवर्धन नगरपालिकेचे कर्मचारी घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी काम करत आहेत . सुमारे आठ टन खतनिर्मिती झालेली आहे.मात्र ठेकदार एक महिन्यापूर्वी सोडून गेला आहे.
-किरणकुमार मोरे , मुख्याधिकारी श्रीवर्धन नगरपरिषद 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा