संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरांत नगरपंचायत व तालुक्यातील ३९ ग्रामपंचायती मार्फत तालुक्यातील नागरीकाना पिण्याचे पाणी पुरविले जाते. शहरातील व तालुक्यांतील बहुतांश ठिकाणचे पाण्याचे स्रोत, जलाशय, विहीरी आटल्याने मिळेल ते व तसेच ( जलशुध्दीकरणाचे कोणतेही पर्याय न वापरता) पाणी नागरिकाना पुरविले जात आहे, अनेक ठीकाणी पुरविले जाणारे विंधन विहीरीचे पाणी हे क्षारयुक्त व दूषीत आसल्याचे पुढे येत आहे.
सातत्याने फार मोठया प्रमाणात दूषीत पाण्याचा पिण्यासाठी वापर होत असल्याने शहरांत काविळ व अन्य साथी सोबतच , किडनीच्या विकाराच्या घटनांतही वाढ होत आहे.
नगरपंचायत, तालुका पंचायत समिती, स्थानिक ग्रामपंचायत स्थरावर शहरी व ग्रामिण पाणी पुरवठा समिती देखभाल , दुरुस्ती व गुणवत्ता त्यातून शाश्वत व सुरक्षित पाणी पुरवठा हे शासनाचे मुख्य धोरण असूनही तालुका तहसीलदार, गटविकास अधिकारी,ग्रा पा. पु.विभाग , जि. प. आरोग्य विभाग, नगरपंचायत प्रशासन मुख्यअधिकारी ,यांचा कुठेही , कसलाही समन्वय नसल्याने शहरात व तालुक्यात दूषीत पाणी पुरवठा होत आहे. अशी नागरिकांची तक्रार आहे.
पाणी निर्जंतुकी .करण्यासाठी क्लोरीनेशन, पाण्यात T.C.L. चा वापर करून केले जाते. परंतु शहर नगरपंचायत, तालुक्यातील ग्रामपंचायती व ग्रामिण पाणीपुरवठा समित्यांच्या माध्यमांतून वापरण्यात येणारी T.C.L पावडर ही I. S.I. मार्कची नसते, तीचा साठा हवा बंद असावा, सुर्यप्रकाशात नसावी , नमुने टेस्ट करणे किंवा त्यामधील क्लोरीन चे प्रमाण चेक करणे . स्त्रोताचे भवती व परिसरात १५ मीटर पर्यंत पाणी साचू नये. स्त्रोताजवळ गुरे -कपडे धुणे या बाबत जलसुरक्षक, आरोग्य सेवक, नगरपंचायत O. S. ग्रामपंचायत आधिकारी ही मंडळी पूर्णपणे दुर्लक्ष करतात अशा तक्रारीही पुढे येत आहेत. म्हसळा शहरांत व तालुक्यात बहुतांश ठिकाणी टंचाई सदृश्य परिस्थिती आहे व होणारा पाणीपुरवठा क्षारयुक्त व दूषीत आहे.
टँकरचे पाणी दूषीतच : महादेव पाटील
टॅकरद्वारे पाणी दूषित होण्याची कारणे....
ज्या गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. अशा गावांमध्ये टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. अस्वच्छ पाणी जिथून उपलब्ध असेल तेथून भरून तो टॅकर गावात उभा केला जातो. अथवा विहिरीत, सोडला जातो. पाणी टंचाई असल्यामुळे लोक मिळेल ते पाणी घेऊन वापरतात. पाणी भरणे पुरविणे यावर शासनाचा कोणताही अंकुश अगर निर्बंध नाही. अतिशय अशुद्ध पाणी सुद्धा नाईलाजाने नागरिकाना वापरावे व प्यावे लागते.

Post a Comment