पुणा- मुंबईत आवक वाढल्याने म्हसळयाचा हापूस आला रस्त्यावर ; पाभऱ्याचा आंबा जातो भाव खाऊन



संजय खांबेटे : म्हसळा 
आंबा म्हटले की हापूस व म्हसळ्यातील हापूस आंबा म्हटला की "पाभऱ्याचा  हापूस " असे काँम्बीनेशन झालेले असतानाच मुंबई येथील वाशी मार्केट व पुणा मार्केट यार्ड येथे  येणाऱ्या आंब्याची आवक वाढल्याने म्हसळ्यातील आंबा बागायतदारानी आपला  माल म्हसळा शहरांत विक्रीला प्राधान्य दिले आहे. शहरांतील आंबा ओटी म्हणून प्रसीध्द असलेल्या रमेश क्लाथ सेंटरच्या परीसरांत हापूस आणि पायरी या प्रकारचा माल विक्रीला येतो कच्या आंब्याचा भाव १०० ते २५० रु डझन , तर पक्का दोन डझन रु ४००ते ६०० भाव असतो. तालुक्यातील पाभरा येथील माल मात्र पाभरा नावानेच ट्रेड मार्क सारखा विकला जातो दोन डझन रु ५००ते ६०० भाव असतो, पाभऱ्याचा माल पेटीच्या  खालून वरपर्यंत एक साईजचा व आगळ्या वेगळ्या स्वादाचा आसल्याने तो नेहमीच भाव खाऊन जातो अशी ' परिस्थीती आहे. फैयाज ऊकये, अस्लम फकीह, फैसल गीते यांच्या जुन्या बागायतील आंब्याला पर्यटकांकडून व आंबा खवय्याकडून  फारच चांगली मागणी असते अनेक पर्यटक फैयाज ऊकये यांच्या बागेत जाऊन थेट खरेदी करतात.

" म्हसळा तालुक्यात सुमारे १७०० हेक्टर मध्ये आंब्याची लागवड आहे,पाभरे धरण क्षेत्रात फार चांगल्या पध्दतीची लागवड आसलेल्या आंबा बागायती आहेत. बहुतांश बागायतदार सेंद्रीय खते व औषधांचा वापर  करतात. या परिसरांत आंब्याचे उत्पादन चांगले येते, दर्जेदार स्वाद, चव असलेला आंबा म्हणून येथील फळांची प्रसीध्दी आहे."
-सुजय कुसाळकर , मंडळ कृषी आधिकारी, म्हसळा.

" कोकणातील हापूसची कलमांची अन्य राज्यांतूनही मोठया प्रमाणांत  लागवड झाली आहे. त्यामुळे हापूस कोकणातील व अन्य राज्यांतील, बदामी ( कर्नाटक), लालबाग ( उत्तर प्रदेश) , तोतापुरी( तामीळनाडू), गोळा( गुजरात), निलम ( बिहार) असा वेगवेगळ्या प्रकारची बाजारांत आवक वाढली आहे."
-फैयाज ऊकये.आंबा बागायतदार,पाभरे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा