म्हसळा : प्रतिनिधी
म्हसळा तालुक्यातील कोळवट बौद्धजन नवनिर्माण मंडळ मुंबई, स्थानिक व रमाबाई महिला मंडळ यांच्या वतीने दि. १९ मे २०१९ रोजी ठिक सकाळी ११.३० वाजता संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६३वी जयंती, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८९वी जयंती, विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८वी जयंती, संत रोहिदास यांची ६४२वी जयंती, अशा प्रकारे संयुक्त जयंतींचे आयोजन कोळवट येथे करण्यात आले होते.
यावेळी सभेचे अध्यक्षस्थान मा.श्री. निलेशजी येलवे यांनी भुषवले. या जयंतीला प्रमुख पाहुणे म्हणुन स्थानिक मंडळाचे अध्यक्ष सुनिल येलवे, सरचिटणीस गोपीचंद येलवे, सरचिटणीस संदेश येलवे, खजिनदार सचिन पवार, उपसचिव जितेंद्र येलवे, किशोर येलवे बौद्ध उपासक विठोबा पवार, प्राथमिक शिक्षक जयसिंग बेटकर, रविंद्र कुवारे मंडळाचे सदस्य अमिर येलवे, रुपेश येलवे, विशाल पवार, राजेश पवार, मयुर येलवेे, दिपक येलवे,प्रकाश येलवे, दिनेश येलवे , अशोक येलवे, विनोद पवार, शंकर पवार, गिरीश पवार, मनिष पवार, काशीराम सुलविलकर, मोहन येलवे, सुभाष येलवे, शुभम येलवे, निलेश सुलविलकर, रमाबाई महिला मंडळ सदस्या सुलोचना पवार, शुंभांगी येलवे, मिनाताई येलवे, विजया येलवे, सखुबाई येलवे, मनिषा येलवे, अंकिता येलवे, वत्सला येलवे, कांचन येलवे, सुलोचना येलवे, पुष्पा येलवे, प्राजक्ता येलवे, अनिता येलवे, सुनंदा येलवे, रेश्मा येलवे, सरस्वती येलवे, जयश्री पवार, सुवर्णा येलवे, रेश्मा विलास येलवे इ. मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुजेचे नियोजन करण्यात आले होते. तसेच उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपले बहुमोल मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले. यावेळी म्हसळा तालुका वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून कार्यक्रमाला शोभा आणली. या कार्यक्रमानिमित्त गावच्या सामाजिक विकासासाठी लक्की लाॅटरी ड्राॅचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी या जयंती सभेचे सुत्रसंचालन सरचिटणीस संदेश येलवे, सचिन पवार यांनी केले व स्वागत सुनिल येलवे यांनी केले. आणि आभार प्रदर्शन जितेंद्र येलवे यांनी केले.

Post a Comment