तालुक्यात भगवान गौतम बुध्द . श्री. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा.



संजय खांबेटे : म्हसळा 
  म्हसळा तालुक्यात  बहुतांश ठिकाणी भगवान गौतम बुध्द यांचा २५६३ वा. श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३८९ वा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२८ वा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला धम्म ध्वजारोहण, प्रतिमेची मिरवणुक,पुष्पार्पण, धम्म पूजा पाठ, धम्मप्रवचन असे कार्यक्रमाचे भरगच्च स्वरूप होते. सुरई येथील कार्यक्रमात मनोहर तांबे, एस डी . पवार, अनंत येलवे, प्रज्ञा मोरे, राहुल येलवे, समीर येलवे, सुनंदा जाधव, शशीकांत येलवे, सचिन येलवे . तोंडसुरे येथील. कार्यक्रमात स. भी. पवार, मुकुंद पवार, अनंत येलवे गुरुजी . सुभाष जाधव, विठोबा पवार, रघुनाथ कांबळे,बाबूराव साळवी, अनिल जाधव व अन्य मंडळीं,चा विशेष सहभाग होता. तालुक्यातील कोकबळ , सरवर, सुरई, देवघर, ढोरजे , तोराडी, कांदळवाडा, जांभूळ , कुंभळे या गावातुन  संयुक्त जयंती महोत्सव मोठया प्रमाणात साजरा झाल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा