म्हसळ्यात अनधिकृत पार्किंग मुळे वाहतुक कोंडी ; पोलिसांचे प्रशासनाचे दुर्लक्ष


संतोष सापते : श्रीवर्धन प्रतिनिधी 

म्हसळा शहरात अनधिकृत पार्किंग मुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे .म्हसळा पोलीस प्रशासना कडून मात्र त्या कडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. मे महिन्यात लग्न सराई व शालेय सुट्टीमुळे चाकरमानी गावाकडे आले आहेत .म्हसळा हे व्यापारी दृष्टया महत्वाचे शहर आहे .त्या कारणे शहराच्या बाजार पेठेत लोकांची प्रचंड गर्दी आहे .सकाळ पासून बाजारपेठेत वर्दळ सुरू होते .बाजारातील व्यापारी आपला माल उतरवण्यासाठी मालवाहतुकीचे ट्रक दुतर्फा उभे करत आहेत .म्हसळा शहरातील रस्ता अरुंद असून दुहेरी वाहतुक करणे अवघड आहे .त्यात व्यापारी मालाच्या ट्रक व इतर वाहनांमुळे प्रचंड वाहतुक कोंडी होत आहे .म्हसळा एस टी स्थानकाच्या आवारात खाजगी ट्रॅव्हल प्रवाशी चढउतार करत आहेत .परंतु एस टी प्रशासन व पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करतांना दिसत नाही पर्यायाने म्हसळा एस टी स्थानक ते पोलीस स्टेशन व तांबट आळी ते पाबरा रस्त्या पर्यंत वाहतुक कोंडी झालेली नियमित निदर्शनांस येत आहे .सर्वसामान्य माणसाला वाहतुक कोंडीचा प्रचंड त्रास होत आहे .म्हसळा मुख्य रस्त्याला पर्यायी  रस्ता बायपास असून ही खाजगी गाड्या व  पर्यटक हे म्हसळा गावातील मुख्य  रस्त्याने श्रीवर्धन व दिवेआगार कडे जातात .पोलीस प्रशासनाचे  वाहतुकी संदर्भात योग्य नियोजन नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे .शुक्रवारी सकाळी म्हसळा बाजार परिसरात मालवाहतुकीच्या  ट्रक ने जवळपास एक तास वाहतुक कोंडी निर्माण केली होती .रस्त्याच्या दुतर्फा ट्रक थांबून मालाची चढ उतार करण्यात आली .या मध्ये जवळपास एक तास गेल्याचे दिसून आले .म्हसळा दिघी वळण रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग ही नित्याची बाब आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा