तोंडसुरे प्रादेशिक पाणी योजना : शासन करीत आहे कृत्रिम पाणी टंचाई : संबंधीत आधिकाऱ्यांची चौकशी व्हावी : महादेव पाटील



संजय खांबेटे : म्हसळा 

     शासनाचे  लघु पाटबंधारे विभागाचे मार्फत  टंचाईच्या कार्यकाळात पाभरे धरणाचे दुरूस्तीचे काम हाती घेऊन धरणातील बहुतांश पाणी विसर्ग केल्याने पाभरे धरणावर अवलंबून असलेल्या नळ पाणी पुरवठा योजना आता पाण्याअभावी ठप्प झाल्या आहेत याचा मोठा फटका तोंडसुरे नळ पाणी पुरवठा योजनेवर पडला आहे या योजनेवर अवलंबून असलेली १० गावे आणि ४ वाड्याना होत असलेल्या पाणी टंचाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या आधीकाऱ्यांची चौकशी होऊन निलंबन व्हावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तोंडसुरे प्रादेशिक नळ योजनेचे अध्यक्ष महादेव पाटील यानी केली आहे.
      लघु पाटबंधारे विभागाचे पाभरे येथील धरणाचे गेट व अन्य ढासळलेल्या कामाबाबत पाटबंधारे विभागाने ७ जाने २०१९ रोजी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार म्हसळा याना पूर्वसूचना दिली होती . तशाच पद्धतीने संबधीत ग्रामपंचायतीना पाटबंधारे विभागाने दिल्याचे सांगण्यात आले. कल्पना देऊनही ठोस व कृतीशील आराखडा न बनविता  महसूल, पंचायत समिती व ग्रा .पा. पुरवठा विभागाने वेळ काढू पणा केला. स्थानिक ग्रामस्थानी पाठपुरावा केल्यानंतर  तब्बल ४ महीन्यानी १ ० गावे ४ वाडयांच्या  २ मे २०१९ रोजी उपविभागीय आधिकारी श्रीवर्धन यानी तहसीलदार यांच्या दालनात बैठक घेतली. परंतु पाणी टंचाईच्या कालावधीत  आपली महत्वाची जबाबदारी झटकून  प्रांत आधिकारी श्रीवर्धन यानी पाटबंधारे विभागाने जॅकवेल पर्यत धरणाचे Dead Stock मधून पाणी लीफ्ट करून द्यावे असा तुघलकी निर्णय घेतल्याने आज १०-१२ दिवस होऊनही Dead Stock मधील पाणी तहानलेल्या गावाना मिळत नसल्याची परीस्थिती आहे.
    तालुक्यात पाणी टंचाईची परीस्थीती निर्माण झाल्यावर ग्रामसेवक, तलाठी, गटविकास आधिकारी, उप -अभियंता ग्रा.पा. पु.विभाग यानी संबधीत गाव,वाडयाना प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थिती दर्शक आढावा वरीष्ठाना देणे बंधनकारक आहे. अद्यापही तशा पद्धतीची ठोस कारवाई झाली नाही. पाटील यानी संबधीतांजवळ मोबाईल व्दारे संर्पक साधला असता बहुतांश आधिकारी Swith off मोड मध्ये होते असेही पाटील यानी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.



फोटो : पाभरे धरणातील Dead Stock पाणी बधीतले आधीकाऱ्यानी पण १२ दिवस झाले तरी टंचाई ग्रस्त गावाना पोहोचत नाही त्या बद्दल ग्रामस्थांची नाराजी वाढत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा