म्हसळयाचे पाण्यासाठी मुख्यमंत्र्याना निवेदन : मंगळवारी घडकणार मोर्चा
नगरपंचायत प्रशासनाची निष्क्रीयता : उपनगराध्यक्षानी पाण्याच्या मागणीकडे फिरवली पाठ
संजय खांबेटे : म्हसळा
म्हसळा शहरांतील पाणी प्रश्न गंभीर होत असताना आज शहर संघर्ष समितीच्या माध्यमातून मा. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस याना व जिल्हाधिकारी, नगरविकास विभाग याना नायब तहसीलदार के.टी. भिंगारे व म्हसळा पोलीस ठाण्याचे सपोनी प्रवीण कोल्हे यांच्या माध्यमातून अध्यक्ष सुशिल यादव यानी संघर्ष समितीच्या माध्यमातून निवेदन दिले. यावेळी
ज्येष्ठ पत्रकार संजय खांबेटे, उदय कळस ,सचिन करडे, नदीम दफेदार, रफिक घरटकर, अनिकेत पानसरे, योगेश करडे, प्रदीप कदम, जब्बारसिंघ राजपूत, सचिव नदीम दाफेदार, विशाल सायकर, गणेश हेगिष्टे , खजीनदार कांतीलाल जैन ,यतीन करडे, इम्तियाज बावासाब, नझीर काझी, प्रसाद पोतदार, दुर्जनसिंघ रजपूत, चंपालाल जैन, संतोष उद्धरकर सुरेश जैन, अश्फाक काठेवाडी यांच्यासहित असंख्य शहराती fल नागरिक उपस्थित होते.
संघर्ष समितीने निवेदनाद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या निकषाप्रमाणे नगर पंचायत हद्दीतील प्रत्येक नागरीकाला समान मापक, दाब व वेळेनुसार पाणी वितरीत व्हावे , ते स्वच्छ,शुद्ध व पिण्यास योग्य असावे अशी प्राधान्याने मागणी केली, ग्रामपंचायत काळापासून २००८-९ पासून मंजुर योजना पूर्ण करणे, नव्याने सुरु करणाऱ्या विंधण विहीरी व त्यातून होणारा पाणी पुरवठा हा अशुध्द आहे त्यामुळे शहरात व तालुक्यात रोगराईत वाढ झाली आहे. म्हसळा शहरात पिकअप व्हॅन व सीन्टेक्स टाकीने सुरु असणारी वितरण व्यवस्था ही पूर्णपणे सदोष आहे. या सर्व प्रणालीत Ceo म्हसळा यांचा भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी व शासन होण्याची मागणी संघर्ष समितीने लावून धरली आहे. अशाच पद्धतीचे निवेदन नगरपंचायतीच्या दिपाली रामा मुंडये, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी याना देण्यात आले. यावेळी नगरपंचायत कार्यालयांत उपनगराध्यक्ष संजय कर्णिक यानी ग्रामस्थांची कोणतीही दखल न घेत केबीन मध्ये ठेकेदारा जवळ बसुन राहील्याने उपस्थित ग्रामस्थानी संतप्त भावना व्यक्त केल्या.
"महाराष्ट्र नगरपंचायती अधिनियम १९६५ च्या कलम ५० प्रमाणे नगरपंचायतीच्या Ceo ना पाणी पुरवठयाची योजना तयार करणे आणि विवक्षित मुदतीत नागरिकाना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना म्हसळा नगरपंचायतीच्या Ceo काहीच केले नाही"
येत्या २ दिवसात म्हसळा शहराला अपेक्षीत पाणी पुरवठा न झाल्यास मंगळवार दिं.१४ मे. रोजी आंदोलन छेडण्यात येणार आहे.
सुशिल यादव , अध्यक्ष म्हसळा शहर संघर्ष समिती.

Post a Comment