म्हसळयात महावीर जयंती उत्साहांत साजरी


संजय खांबेटे : म्हसळा 
महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. मोठया संख्येने जैन श्रद्धाळू हा सण साजरा करतात. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला.या दिवशी सर्वत्र महावीर जयंती साजरी होते. काल म्हसळा शहरांत फार मोठया प्रमाणात महावीर जयंती साजरी झाली.यावेळी जैन बांधवानी जैन मंदीरातून महावीरांचे प्रतिमेचे पूजन करून जैन मंदीर , बाजारपेठ, सोनार आळी . तांबट आळी, ब्राह्मण आळी, पोलीस स्टेशन मार्गे, जैन कॉलनी, नगरपंचायत , जैन मंदीर अशी शोभा यात्रा काढली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समाजाचे अध्यक्ष सुरेश जैन,उपाध्यक्ष कांतिलाल जैन, मुकेश जैन, मनिष जैन, रमेश शेठ , रणजितशेठ जैन, चंपालाल जैन, अशोक भंडारी,विनोद जैन, महावीर जैन,खेतल, चेतन जैन अनिकेत जैन, राजू जैन, ललीत जैन, दिनेश जैन यानी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा