तटकरेना जुमल्याचा प्रश्न मांडण्याचा नैतीक अधिकार नाही
संजय खांबेटे : म्हसळा
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे प्रमुख व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यानी म्हसळा तालुक्यातील पत्रकारांजवळ आज सु- संवाद बैठक घेतली यामध्ये मतदार संघाचे विकासा सोबत " म्हसळा तालुक्याचा विकास हाच भाजपाचा ध्यास " असे धोरण असल्याचे स्पष्ट करीत. राष्ट्रीय सुरक्षा व विकास या मुद्दावर युतीचा प्रचार केंद्रीत आहे.युतीचे उमेदवार अनंत गीते यांचा विजय निश्चित असल्याचे कोबनाक यानी सांगितले.
जिल्हा अध्यक्ष आ. प्रशांतदादा ठाकूर व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या आभ्यासू नेतृत्वाने राष्ट्रीय व राज्य स्थरीय अनेक समस्या सोडविताना विविध विकास कामे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावले. राज्य , जिल्हा, तालुका, गाव वाडयां तील रस्ते, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, गाव - वाडी जोड रस्ते केंद्रातील व राज्यातील सरकारने पुरी केली . त्यामुळेच म्हसळा तालुका, श्रीवर्धन मतदारसंघ व रायगड जिल्हयांत भाजपाची संघटना मजबुत होत आहे, गाव- वाडी व बुथ पातळीवर कार्यकर्ता तयार होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे नी घेतलेला महत्वपूर्ण निर्णयामुळे शिवसेना भाजपाची एकसंध फळी शिवसेचे ३२ रायगडचे उमेतदवार अनंत गीते यांच्या प्रचाराची सकारात्मक वाटचाल करीत आहेत त्यामुळे अनंत गीतेंचा विजय मिश्चित आसल्याचे कोबनाक यानी आत्म विश्वासाने सांगितले.केंद्राची राष्ट्रीय नेतृत्वाची धुरा पंतप्रधान नरेंद्र मोदी समर्थपणे सांभाळणारे नेतृत्व असल्याने आम्ही युतीच्या माध्यमातून अनंत गीते ना केंद्रात पाठविणारच असे कोबनाक यानी सांगितले.
मागील चार वर्षांत म्हसळयात केलेला विकास हा आम्ही युतीनेच केला : कोबनाक
म्हसळा तालुक्यातील रस्ते, मुख्यमंत्री सडक योजना, गाव- वाडी जोड रस्ते , नळ पाणीपुरवठा योजना अशा प्रत्येक विकास कामात राज्य शासनाचा महत्वाचा रोल असतो त्या अनुषंगाने आम्ही युतीच्या माध्यमातून पाभरे -चिचोंडा रस्ता केला. जांभूळ, घूम रुद्रवट, सकलप कोंड ते नेवरूळ -ठाकरोली - सांगवड , देहेन पाष्टी पांगळोली रस्ता ही कामे प्रगतीपथावर आहेत. राष्ट्रीय पेयजल योजने मध्ये तुरुंबाडी, काळसुरी, गोंडघर, सुरई मोहल्ला, खारगांव (बु ),मांदाटणे, कलटे ,बाऊल कोंड, सोनघर, रेवली,वाडांबा, कोंझरी, ठाकरोली, पानवे,वावे ह्या महत्वाच्या न.पा. पु. योजनाना अंतीम टप्प्यात मंजुरी दिली आसल्याचे प्रसीद्धी पत्रकात म्हटले आहे
तटकरे पक्के थापेबाज , भाजपाच्या जुमल्याबाबत त्याना बोलण्याचा नैतीक आधिकार नाही : कोबनाक
पत्रकारांच्या आभ्यासू प्रश्नना उत्तरे देताना कोबनाक यानी सुनील तटकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेस वर जोरदार हल्ला करत सर्वच बाजूने संकटात व शेवटची घटका मोजणारे सुनील तटकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपाचा जुमला यावर का बोलतात त्याना काय अधिकार असा प्रती प्रश्न करीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, राज्य शासनाची नगरोथ्थान योजना याना तटकरे निधी कसे देणार ते पक्के थापे बाज आहेत. राज ठाकरे यांच्या प्रचाराबाबत कोबनाक यानी अत्यंत माफक उत्तर देत राजच्या प्रचाराने शिवसेना -भाजपा -रिप.पक्षाचे कार्यकर्ते प्रचंड निष्ठेने , चिडून व आत्म विश्वासाने काम करीत असल्याचे सांगितले.

Post a Comment