आज राज ठाकरे यांची तोफ महाडमध्ये धडाडणार



टीम म्हसळा लाईव्ह
लोकसभेची एकही जागा न लढवता केवळ मोदी - शहा मुक्त भारत हे एकच लक्ष्य समोर ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. राज ठाकरे यांचे सडेतोड विचार ऐकण्यासाठी प्रत्येक सभेला विक्रमी गर्दी होत असून राज ठाकरे यांची ही तोफ शुक्रवार १९ एप्रिल रोजी महाडच्या चांदे क्रीडांगणावर धडधडणार आहे . महाडच्या या सभेत राज ठाकरे हे आपल्या ठाकरी शैलीमध्ये कुणाकुणाचे वस्त्रहरण करणार याची उत्सुकता तमाम रायगडवासियांसह कोकणाला लागून राहिली आहे . महाडमधील राज ठाकरे यांची आजची सभादेखील इतर विभागात झालेल्या सभांप्रमाणे ऐतिहासिक होणार असल्याचा दावा मनसेचे राज्य सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे . राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोणत्याही राजकीय पक्षाशी आघाडी अथवा युती केली नसून गेली ५ वर्षे जनतेला दिलेली आश्वासने न पाळता सर्वसामान्यांची फसवणूक आणि अपेक्षाभंग करणारी भाजप - शिवसेना युती सत्तेवर येऊ नये , यासाठी या युतीच्या उमेदवाराला मत देऊ नका , असे आवाहन करीत मोदी शहा यांचे खरे रूप पुराव्यानिशी राज ठाकरे जनतेसमोर दाखवून देत आहे . राज्यात ठाकरे यांच्या दहा सभा होणार असून कोकण प्रांताचीही सभा महाड येथे होत असून या सभेत राज ठाकरे कुणाकणावर निशाणा साधणार याची उत्सुकता सर्वच राजकिय पक्षांना असणार आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा