दिघी : वार्ताहर
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे श्रीसिद्धनाथ व श्रीकेदारनाथ यात्रेची लगबग आली, बुधवारपासून दोन दिवस भरणाऱ्या यात्रेला राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात . यावेळी सलग सुट्टीमुळे यात्रेला गर्दी दिसून आली . श्रद्धेने होणारी येथील गळी फिरणे व हाथकोडे यात्रेतील वैशिष्ट्य ठरत आहेत . या उत्सवात दोन दिवस दिवेआगर गावाम धील घरोघरी श्री भैरवनाथाची परडी फिरते . सालाबादप्रमाणे गावातील मंडळीकडून मानपान दिला जाते आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाला साकडे घातले जाते हाथकोडेच्या परंपरेनुसार मंदिराच्या आवारात खेळले जाते . यानंतर पुढे या यात्रेचे आकर्षण ठरते ते गळी फिरणे . मंदिरासमोरील पटांगणात चौथरा आहे . तिथे पुजा-याला गळ टुपवण्यात येते . नंतर साठीवर लाट फिरवण्यासाठी नेलं जात . ही लाट जमिनीपासून ३० फुटावर असते . या उंचीवर समांतर बांधून एका बाजूला पुजा-याला गळाच्या दोरीने बांधून पाच फे-या फिरवले जाते . प्रसंगी ऐका हो ऐका . . . . ललकारी केली जाते . यात्रेमध्ये पंचक्रोशीतील लहान - थोर सहभागी होत आनंद घेताना दिसले . या यात्रेची जय्यत तयारी स्थानिक यात्रा कमिटीकडून केली जाते . यात्रा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी ग्रामपंचायत दिवेआगर व ग्रामस्थांचे नियोजन पूर्व सहकार्य मिळते . असे श्री सिध्दनाथ भैरीचे पुजारी विरकुड यांनी सांगितले .

Post a Comment