नालासोपारा श्रीवर्धन बसचा घोणसे येथे अपघात : सुदैवाने २० प्रवासी थोडक्यासाठी बचावले


म्हसळा (निकेश कोकचा )
 म्हसळा तालुक्यातील घोणसे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या नालासोपारा श्रीवर्धन या बसला पहाटे रस्ते विकासक जेएम म्हात्रे यांच्या डंपरने समोरून धडक दिल्याने अपघात झाला असून, या अपघातामध्ये २० प्रवासी थोडक्यासाठी बचावले आहेत.मात्र या अपघातामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे.
सोमवार दि. ८ एप्रिल रोजी नालासोपारा येथून सुटणारी रातराणी  नालासोपारा - ठाणे -साई मार्गे बोर्ली - श्रीवर्धन क्र. एमएच २० बिएल २४३२ या बसला ९ एप्रिल रोजी पहाटे ४च्या सुमारास म्हसळा तालुक्यातील घोणसे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये रस्ते विकासक जेएम म्हात्रे यांच्या डंपरने समोरून धडक दिल्याने अपघात झाला आहे. अपघात एवढा भिषण होता की, बस चालकाच्या बाजूचे संपुर्ण नुकसान झाले आहे. मात्र या अपघातामध्ये बसमधून प्रवास करणारे २० प्रवासी चालकाच्या प्रसंगसावधतेमुळे थोडक्यासाठी बचावले असल्याची माहिती बसमधिल एका प्रवाश्यांने दिली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा