येत्या लोकसभेला तटकरे विरुद्ध गीते असा सामना रंगणार नसून, तटकरे विरुद्ध अंतुले असा युद्ध होणार असल्याचे नाविद अंतुले यांचे संकेत : तर काँग्रेस तालुकाअध्यक्ष मोईज शेख यांचा वडिलांचा अनंत गीते यांना पाठिंबा दिल्याने कॉग्रेसच्या अडचणीत वाढ
म्हसळा (निकेश कोकचा )
आगामी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीचा सामना अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे यांच्यात होणार नसून, सुनील तटकरे विरुद्ध अंतुले असा युद्ध होणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री स्व.बॅरिस्टर ए.आर अंतुले यांचे सुपुत्र नाविद अंतुले यांनी राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना म्हसळा तालुक्यातील पांगलोली येथे झालेल्या जाहीर सभेत दिला. तर म्हसळ तालुका कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ.मोईज शेख यांच्या वडिलांनी अनंत गिते यांना या सभेत पाठींबा दर्शवत संपुर्ण कॉग्रेस पक्षाला अडचणीत आणण्याचे काम केले आहे.
स्व.अंतुले यांचा शेवटच्या टेप रेकॉर्डिंग मध्ये ज्या भावना अंतुले साहेबांनी मांडल्या आहेत, त्या ऐकल्यानंतर खूप त्रास झाला. त्यामुळे मी लढण्याचा निर्णय केला असून ज्यांनी माझ्या वडीलांना त्रास दिला त्या त्रासाचा हिशोब बरोबर करण्याची वेळ आता आली असल्याचे नाविद अंतुले यांनी सांगितले. हा वचपा काढण्यासाठी व गावागावांत विकास घडवण्यासाठी शिवसेना पक्ष योग्य असल्याने मी शिवसेनेत प्रवेश केल्याचे पुढे बोलताना अंतुले यांनी सांगितले. सदर सभेला मार्गदर्शन करताना म्हाप्रळ येथील सुलतान मुकादम यांनी सुद्धा आपल्यावर कशा प्रकारे अन्याय झाला हे भाषणातून सांगितले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नंदू शिर्के, अक्रम साने, बाळा म्हात्रे, समीर धनसे,आणी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या सभेला काँग्रेस तालुका अध्यक्ष मोईज शेख यांचे वडील डॉ अब्दुल अजीज शेख उपस्थित राहल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असुन आपण सुदधा नाविद अंतुले यांचा भूमिकेला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी पांगलोली येथील सभेत सांगितले. हि सभा सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय अलिशेठ कौचाली यांचा गावात झाली होती. राष्ट्रवादी व कॉगेस (आय ) यांची आघाडी असतानाही काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ मोईज शेख यांचा वडिलांनी सदर सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन केल्यांन म्हसळा तालुक्यात कॉग्रेसच्या भूमीके संदर्भात तर्क वितर्काला उधाण आले आहे. आगामी लोकसभा निवडणूकी मध्ये कॉग्रेस पक्ष जरी शिवसेनेसोबत नसला तरी म्हसळा कॉग्रेस पक्षात घडणाऱ्या अंतर्गत घडामोडींमुळे गिते यांची दिल्ली वारी कॉग्रेसच्या अदृष्य समर्थनामुळे मात्र नक्की झाल्याचे समजते.

Post a Comment