राजकारणात वारसदार रक्ताने नाही तर कर्तृत्वाने ठरतो - सुनील तटकरे



श्रीवर्धन : संतोष सापते

रायगड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कर्तृत्ववान खासदारांची गरज आहे .केंद्रातील निधीचा वापर कसा करावा याची जाण विद्यमान खासदारांना नाही .मला कोकणच्या मातीचे ऋण विकासाच्या रूपाने फेडायचे आहेत .श्रीवर्धन चा आमदार या नात्याने विकास कामे करण्याचे भाग्य मला  लाभले आता खासदार म्हणून काम करण्याचे संधी द्या रायगड जिल्ह्याचे पर्यटन जगाच्या नकाशावर दिसेल असे सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन राष्ट्रवादी काँग्रेस ने आयोजित सभेत सांगितले . श्रीवर्धन   तालुक्यात  लोकसभेच्या प्रचाराने जोर पकडला आहे .आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी श्रीवर्धन तालुक्यातील विविध सभातून आपली भूमिका जनते समोर मांडली .श्रीवर्धन मधील  कसबा पेठेतील चौक सभेत त्यानी उपस्थित कार्यकर्ते व मतदार यांना संबोधित केले .जनतेचा प्रतिनिधी या नात्याने मला विकासाची गंगा दिल्ली वरून रायगड पर्यंत आणायची आहे .आता पर्यंत करोडो रुपयांची विकास कामे मी श्रीवर्धन चा आमदार या नात्याने केले आहेत .श्रीवर्धन चा कायापालट  करण्याचे भाग्य मला लाभले आहे .भविष्यात विविध समाज उपयोगी विकास कामांना मी चालना देणार आहे .गेली पाच वर्षे सत्तेत नसतांना सुद्धा विकास निधींची कमतरता मी कधीच भासू दिली नाही .आज रायगड जिल्ह्यातील जनता विकासाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे .याचा मला विश्वास आहे .बॅरिस्टर अंतुले हे माझे मार्गदर्शक होते .त्यानी कोकणाच्या विकासाला चालना दिली .त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी अर्थ मंत्री असतांना सर्वात मोठे पॅकेज कोकणाच्या जनतेसाठी दिले .त्या वेळी विरोधातील पक्षाने हा कोकणचा अर्थ संकल्प आहे असे बोलत माझ्यावर टीका केली .मला खासदार म्हणून दिल्लीत जाण्याची संधी द्या .मला कोकणच्या मातीचे ऋण विकास रुपी कर्तुत्वाने फेडायचे आहेत असे तटकरे यांनी सांगितले .अनंत गीते यांच्या प्रचार सभेतील त्यांच्या भाषाशैलीची संभावना करतांना तटकरे यांनी सांगितले मला यशवंतराव चव्हाण ,शरद पवार ,यांचा वैचारिक वारसा लाभला आहे ते संस्कार आमच्यावर आहेत .त्यामुळे माझी सापाशी केलेली तुलना  ही असंस्कृत पणाचे द्योतक आहे .या वर्षी ची आपली लढाई ही निष्क्रियते विरुद्ध  विकास अशी करायची आहे. अनंत गीते रायगडच्या जनतेचे मुलभूत प्रश्न सोडवण्यात अपयशी झाले  आहेत.त्यांच्या निष्क्रियते मुळे जनता त्याना कंटाळली आहे असे सांगत .
 राजकारणात वारसदार हा रक्ताने नव्हे तर विचारांच्या अथांगतेतून कर्तृत्व सिद्धी द्वारे ठरवला जातो .असे तटकरे यांनी अप्रत्यक्ष पणे  नाविद अंतुले यांच्या शिवसेना प्रवेशा संदर्भात भाष्य केले .तालुक्यातील मुस्लिम समाज माझ्या पाठीशी ठाम पणे उभा आहे .मी धर्मनिरपेक्ष विचारांचा पाईक आहे .सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे. आपला विकास साधावा ,विकासातून प्रगतीचे दारे सर्वांसाठी खुली व्हावेत त्यासाठी मला खासदार म्हणून संधी द्या आगामी काळात जिल्ह्याचा चेहरामोहरा विकास कामाद्वारे बदलण्याची जबाबदारी माझी आहे .असे तटकरे यांनी सांगितले .सदरच्या सभेसाठी जितेंद्र सातनाक ,नरेंद्र भुसाने ,दर्शन विचारे ,गणेश पोलेकर ,ऋतुजा भोसले ,मोहिनी वैद्य व असंख्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकते  उपस्थित होते .
राष्ट्रवादी काँग्रेसने श्रीवर्धन मोहल्ला ,वाळवंटी ,आरावी ,बोर्लीपंचतन अशा विविध ठिकाणी चौक सभेचे आयोजन केले होते .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा