श्रीवर्धन आगार की भंगार डेपो ? शिवशाही वगळता सर्वच गाडया भंगार


श्रीवर्धन प्रतिनिधी
श्रीवर्धन परिवहन आगारा तुन सुटलेली साधी किंवा निमआराम बस आपल्याला घेउन जात असलेल्या ठिकाणी वेळेमध्ये पोहोचेल याची शाश्वती देता येत नाही. कारण श्रीवर्धन परिवहन आगरातील शिवशाही बसेस वगळता साध्या व निमआराम बसगाड्या पूर्णपणे भंगार झालेल्या आहेत. श्रीवर्धन आगारातून सुटलेली बस सहा ते सात किलोमीटर पुढे गेल्यानंतर अनेकदा बंद पडते . काही वेळा श्रीवर्धनपासुन तीन किलोमीटर अंतरावर बोडणी घाटात बस न चढल्यास आगारात आणावी लागते . त्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागतो . प्रवासात वेळ वाया गेल्यानंतर कोणत्याही शासकीय कामासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांना शासकीय कार्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही. सध्या श्रीवर्धन आगारात बसगाड्या श्रीवर्धन आगार कमी असल्यामुळे अनेक लांबपल्लयाच्या फे-या बंद ठेवण्यात आल्या आहेत . ज्या बसगाड्या उपलब्ध आहेत त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे . गाड्या दुरुस्त करण्यासाठी कामगार उपलब्ध असताना गाड्यांचे सुटे भाग उपलब्ध होत नसल्यामुळे बसगाड्यांची कामे करण्यात अडथळा निर्माण होतो. त्यातच श्रीवर्धन आगरातील अनेक चालकांच्या बदल्या झाल्यामुळे आगारात नवीन चालक भरती करण्यात आले आहेत . महामंडळाने नवीन चालक भरती करताना त्यांना वाहकांचेसुध्दा प्रशिक्षण देण्यात आहे . त्यामुळे जुने कर्मचारी नवीन भरती झालेल्यांना ड्रायव्हर कम कंडक्टर म्हणतात . चालक नवीन असल्यामुळे त्यांना रस्ते माहिती नसल्याने गाड्या इच्छितस्थळी पोहोचण्यास उशीर होतो . आता सुट्ट्यांच्या मोसम सुरु होत असल्यामुळे अनेक लांब पल्लयाच्या मार्गावर बसफेऱ्या सुरु होणे गरजेचे आहे . परंतु बसगाड्याच उपलब्ध नसल्यामुळे नविन बसगाड्या आल्यानंतरच या फे-या सुरु होऊ शकणार आहेत . अनेकदा बसस्थानकावर गेल्यावर बस उपलब्ध असते पण चालक किंवा वाहक उपलब्ध नसतो . त्यामुळे बस मार्गस्थ होण्यासाठी उशीर होतो . पर्यायाने आगाराचे वेळापत्रक कोलमडून पडते . बसगाड्या वेळेवर न सुटणे , गाड्या रस्त्यांमध्ये नादुरुस्त होणे . यामुळेच प्रवाशांची संख्या कमी होऊन आगार नुकसानात जात आहे . स्थानिक मार्गावर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बसगाड्या सोडण्यात येतात . कारण सहा आसनी रिक्षांमुळे स्थानिक प्रवासी एसटीपासुन केव्हाच दुरावला आहे . राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी श्रीवर्धन परिवहन आगाराला नविन बसगाड्या तातडीने उपलब्ध करुन द्याव्या तसेच या ठिकाणच्या दुरावस्थेकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा