म्हसळा (बाबू शिर्के)
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ही समाजाची मात्रृ संस्था मागील ९८ वर्षा पासून कार्यरत आहे ही कोकणातील पाच जिल्ह्यातील समाजा करीता काम करते यांच्या शाखा ग्रामीण व मुंबई त विविध प्रकारचे सामाजिक,सांस्कृतीक, कि्डा उपक्रम राबविते व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या समाज बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी रहाते. मागील पाच वर्षे या संस्थेने समाजाचे राजकीय नेतृत्व पुढे यावे या करीता राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या नेतृत्वाला पांठीबा देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. हा निर्णय लोकसभा व विधानसभा मध्ये जे कुणबी बांधव उभे रहातील त्यांच्या पाठी सर्व समाज संघटना पांठीबा देतील असा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती कुणबी समाजाचे नेते भाजप जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकारांजवळ वार्तालाप करताना दिली. म्हसळा तालुक्यातील काही समाज नेते मंडळीने समाज निर्णया विरोधात जाऊन प्रचार करतात हे आमचे दुदैव ! म्हणजे हे नक्की विकले गेले आहेत, हे या वयात समाजाचे काही भले करू शकत नाही. यांच्या गावात यांना मान नाही, याना समाजा बद्दल काही अभिमान नाही. हे म्हणतात श्री सुनील तटकरे यांनी म्हसळा तालुक्यातील समाज बांधवांचा विकास केला, यांच्या गावात काय विकास केला ? हे त्यांनी दाखवावे, त्याची यादी पाठवावी. हे फक्त तटकरे कडून पैसे घेऊन काम करीत आहेत असा आरोप कोबनाक यांनी पुढे बोलताना केला. सुनील तटकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय हा समाज संघटनेचा निर्णय नसून जे राष्ट्रवादी /काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे. म्हसळा तालुक्यातील सर्व समाज श्री अनंत गीते यानांचा पांठीबा देणार! हे मात्रृ संस्थेचा आदेश पाळत नाही त्याना समाज संघटनेवर काम करण्याचा अधिकार राहीलेला नाही, यांच्या विरोधात सर्व समाज बांधवानी, युवकांनी आवाज उठवला पाहीजे, तालुक्यातील सर्व समाज समाज बांधवांनी राजकीय अभिनिवेश न ठेवता श्री अनंत गीते साहेब एक समाज बांधव म्हणून यांच्या पाठी खंबीर पणे उभे रहावे असे नम्र आवाहन कृष्णा कोबनाक यांनी केले.

Post a Comment