म्हसळा तालुक्यातील सर्व कुणबी समाजाची तटकरेंना पसंती : समाज अध्यक्ष महादेव पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती : अनंत गितेंना धक्का :भूषण बरे यांनी स्वार्थासाठी कुणबी समाजात राजकारण आणल्याचा केला आरोप :
म्हसळा : निकेश कोकचा
ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष भूषण बरे हे स्वताच्या स्वार्थासाठी कुणबी समाजाचा वापर करीत असून, संपुर्ण कुणबी समाज गितेंच्या मागे उभा आहे असा विरोधाभास निर्माण करित आहेत. मात्र म्हसळा तालुक्यातील ९० टक्के कुणबी समाज तालुक्यात विकास गंगा आणणाऱ्या तटकरेंच्या पाठीशी ठाम उभा असल्याचा दावा म्हसळा तालुका कुणबी समाजाचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.
यावेळी कुणबी समाज नेते श्रीपद धोकटे, संदेरी विभाग अध्यक्ष दगडू डांगे, उपाध्यक्ष अंकुशखडस, जि.प सदस्य बबन मनवे, पंस उपसभापती संदिप चाचले, युवक अध्यक्ष संतोष पाखड,चिटणिस सतिश शिगवण, चिखलप सरपंच अनिल जोशी यांच्यासहीस कुणबी समाजाचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment